Digital Arrest Scam Viral Video : गेल्या वर्षभरात डिजीटल माध्यमातून होणार्या फसवणुकीची प्रकरणे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. यामध्ये एखाद्याची वैयक्तिक माहिती मिळवून त्याला फोनवरून ब्लॅकमेल करत पैसे लाटण्याचे प्रकार समोर आले आहेत. सायबर गुन्हेगारी विरोधात सरकारकडून जनजागृतीसाठी वेगवेगेळे प्रयत्न केले जात आहेत. पण तरीदेखील दररोज नवीन पद्धतीने फसवणूक झाल्याच्या बातम्या समोर येत राहतात. यादरम्यान मुंबईत एका व्यक्तीला डिजीटल अरेस्ट करण्याचा प्रयत्न फसल्याचा मजेशीर व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये मुंबईतील एक व्यक्तीला पोलिसांचा गणवेश घालून ‘डिजीटल अरेस्ट’ करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र जागरूक व्यक्तीने त्याला मजेशीर पद्धतीने उत्तर दिलं. ही मजेशीर घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून याचा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे.
व्हिडीओच्या सुरुवातील कॉल करणारा व्यक्ती आपण अंधेरी पूर्व पोलीस ठाण्यातील अधिकारी असल्याचा दावा करतो आणि त्या व्यक्तीकडे कॅमेऱ्यासमोर येण्याची मागणी करतो. पण त्या खोट्या पोलिसाचे ऐकण्याऐवजी तो व्यक्ती आपल्याजवळचे कुत्र्याचे पिल्लू उचलतो आणि ते कॅमेऱ्यासमोर धरतो. डिजीटल अरनेस्टच्या माध्यमातून फसवणूक करण्याच्या प्रयत्नात असलेल्या व्यक्तीसाठी हे अनपेक्षित होते. आपला खोटारडेपणा उघड झाल्याचे लक्षात आल्यानंतर तो आपला कॅमेरा बंद करतो.
या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, जेव्हा फसवणूक करणाऱ्याने व्हिडीओ कॉल केला तेव्हा कॉल उचलणाऱ्या व्यक्तीने त्याच्या पाळीव कुत्र्याला कॅमेऱ्यासमोर बसवले आणि स्कॅमरशी बोलण्यास सुरुवात केली. स्कॅमर वारंवर कॅमेऱ्यासमोर येण्याची मागणी करत राहिला, पण तो व्यक्ती आपला कुत्रा दाखवत राहतो आणि मीच कॅमेऱ्यासमोर आसल्याचे सांगतो. अखेर या प्रकारावर स्कॅमर देखील हसू लागतो आणि नंतर कॉल बंद करतो.
हेही वाचा>> IND vs AUS : ‘विकेटची नितांत गरज होती, पण…’, जैस्वालकडून झेल सुटल्यानंतर संतापलेल्या …
हा व्हिडीओ इंस्टाग्राम अकाउंट @shinny_martina वर शेअर करण्यात आली आहे, या कॅप्शनमध्ये लिहिल की मुंबई पोलीस असल्याचा बनाव करत होता… फसवणूक करण्याचा प्रयत्न फसला असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. हा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे. लोक मोठ्या संख्येने हा व्हिडीओ शेअर करत आहेत.
मात्र बंगळुरू येथे अशाच एका डिजीटल अरेस्टच्या घटनेत ३९ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनियरला ११.८ कोटी रुपये गमवावे लागले आहेत. या प्रकरणात आरोपींनी पोलीस असल्याचे भासवून पीडित व्यक्तीवर मनी लॉन्ड्रिंगमध्ये गुंतल्याचा आरोप केला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही फसवणूक २५ नोव्हेंबर ते १२ डिसेंबर या काळात झाली.