पीटीआय, आगरतळा : आगरतळा व मुंबईदरम्यान थेट रेल्वे गाडी सुरू केल्याबद्दल त्रिपुराचे परिवहनमंत्री सुशांत चौधरी यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी व रेल्वेमंत्री अश्वनी वैष्णव यांचे आभार मानले. ही गाडी दुर्गापूजा उत्सवापूर्वी सुरू होण्याची शक्यता आहे. मुंबई व गुवाहाटीदरम्यान धावणारी लोकमान्य टिळक टर्मिनस-गुवाहाटी एक्स्प्रेस आठवडय़ातून एकदा आगरतळापर्यंत धावेल, असे ईशान्य सीमा रेल्वेच्या निवेदनात म्हटले आहे. ‘आगरतळय़ाला मुंबईशी जोडल्याबद्दल आम्ही पंतप्रधान व रेल्वेमंत्र्यांचे अभिनंदन करतो. राज्य सरकार दीर्घकाळापासून मुंबईशी थेट संपर्काची मागणी करत होते आणि आता ती पूर्ण झाली आहे’, असे चौधरी यांनी पत्रकारांना सांगितले.
मुंबई- त्रिपुरा थेट रेल्वेगाडी दुर्गापूजा उत्सवापासून
आगरतळा व मुंबईदरम्यान थेट रेल्वे गाडी सुरू केल्याबद्दल त्रिपुराचे परिवहनमंत्री सुशांत चौधरी यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी व रेल्वेमंत्री अश्वनी वैष्णव यांचे आभार मानले.
First published on: 01-10-2023 at 00:09 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai tripura direct train from durga puja festival ysh