रशिया आणि युक्रेमधील युद्धाचे पडसाद संपूर्ण जगावर उमटत आहेत. या युद्धामुळे अनेक देशांना इंधन दरवाढीला सामोरे जावे लागत आहे. जर्मनी देशात तर खाद्यतेलाची टंचाई निर्माण झाली आहे. याच समस्येवर मात करण्यासाठी बर्लीन येथील एका पबने चांगलीच शक्कल लढवली आहे. येथे ग्राहकांकडून बिअरच्या बदल्या पैसे नव्हे तर चक्क खाद्यतेल घेण्यात येत आहे. याबाबतचे सविस्तर वृत्त Reuters या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने दिले आहे.
हेही वाचा >>> योगींनी उद्घाटन केलेल्या लखनौमधील मॉलमध्ये हनुमान चालिसा पठणाचा प्रयत्न, २० जणांवर पोलीस कारवाई
जागतिक पातळीवरील सूर्यफुल तेलाच्या निर्यातीमध्ये रशिया आणि युक्रेन या देशांचा वाटा ८० टक्के आहे. मात्र मागील काही महिन्यांपासून या दोन देशांमध्ये युद्ध सुरु आहे. परिणामी सूर्यफूल तेलाची निर्यात खोळंबली आहे. याचा फटका जर्मनीला बसला आहे. या देशात सूर्यफुल तेलाची आयात कमी झाल्यामुळे येथे खाद्यतेल टंचाई निर्माण झाली आहे. यालाच उपाय म्हणून म्युनिक येथील एका पबमध्ये बिअरच्या बदल्यात चक्क सूर्यफुलाचं तेल घेण्यात येत आहेत. येथे सूर्यफुल तेलाच्या बदल्यात समप्रमाणात बिअर दिली जात आहे.
हेही वाचा >>> मथुरा: कचरा गाडीत योगी आदित्यनाथ, नरेंद्र मोदींचे फोटो, सफाई कर्मचाऱ्यानं गमावली नोकरी
या खास ऑफरबद्दल पबचे व्यवस्थापक एरिक हॉफमॅन यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. “खाद्यतेलाची खूप टंचाई निर्माण झाली आहे. ३० लीटर खाद्यतेल हवे असल्यास तुम्हाला फक्त १५ लिटर मिळते. त्यामुळे आम्हाला अडचणी येतात. यावर काहीतरी उपाय शोधणे गरजेचे होते. म्हणूनच आम्हाला ही कल्पना सूचली,” असे एरिक हॉफमॅन यांनी सांगितले.
हेही वाचा >>> शारजाहहून हैदराबादला येणारं इंडिगो विमान पाकिस्तानातील कराचीला वळवलं
दरम्यान, पबने राबवलेल्या या नामी युक्तीला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. जर्मनीमध्ये एका बिअरची किंमत साधारण सात युरो आहे. तर एक लिटर सूर्यफुलाची किंमत साधारण ४.५ युरो आहे. त्यामुळे ग्राहकांनादेखील ही ऑफर चांगली आणि आकर्षक वाटत आहे. आतापर्यंत या पबला ग्राहकांनी बिअरच्या बदल्यात जवळपास ४०० लीटर सूर्यफुलाचे तेल दिले आहे.