छत्तीसगढमध्ये एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे वडिलांनी लेकीच्या प्रियकराबरोबर संगनमत करून तिचा खून केला आहे. समाजात बदनामी करत असल्याने वडिलांनी, तर लग्नाला तगादा लावत असल्याने प्रियकराने तरुणीचा काटा काढला आहे. तरुणी गर्भवती असल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसांनी तरुणीच्या वडिलांना आणि प्रियकराला अटक केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

छत्तीसगढमधील रायगढ येथे ही घटना घडली आहे. टिकली चौहान असं खून करण्यात आलेल्या तरुणीचं नाव आहे. तर, रामरतन चौहान असं तरुणीच्या वडिलांचं, तर वी.के सिंह यादव असं प्रियकराचं नाव आहे. २८ जुलैला तरुणाला फोनवर बोलत-बोलत टिकली बाहेर गेली होती. पण, काही वेळानंतर तिचा मृतदेह घराच्या पाठीमागे आढळल्याचं वडिल रामरतन चौहानने पोलिसांना सांगितलं होतं. मात्र, पोलिसांनी टिकलीच्या भावजीची चौकशी केल्यावर सर्व बिंग फुटलं.

२८ जुलैला टिकलीच्या पाठीमागे तिचे वडिल रामरतन चौहानही गेले होते, असं भावजीने पोलिसांना सांगितलं. यानंतर खाक्या दाखवताच रामरतन चौहानने पोलिसांना सर्व माहिती दिली. मुलीचा खून करण्यासाठी प्रियकर वी.के सिंहचा सुद्धा सामील होता, असं रामरतन चौहानने पोलिसांना म्हटलं.

हेही वाचा : मुंबईत बड्या उद्योगपतीकडून अभिनेत्रीवर अनेकदा बलात्कार, गुन्हा दाखल

उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक मिश्रा म्हणाले की, “तरुणीचे वडिल रामरतन चौहान आणि प्रियकर वी.के सिंहला ताब्यात घेतलं आहे. दोघांनी टिकलीचा खून केल्याचं कबूल केलं आहे.”

वी.के सिंहने पोलिसांना सांगितलं की, टिकली गर्भवती असल्याचं समजल्याने रामरतन चौहान नाराज झाले होते. टिकली समाजात बदनामी करत असल्याचं म्हणत रामरतन चौहान तिला ओढत नेत होते. तेव्हा ओढणीने टिकलीच्या गळ्याला फास लागला. यात तिचा मृत्यू झाला.

हेही वाचा : VIDEO: संतापजनक! छत्तीसगडमध्ये वसतिगृहाच्या खोलीत मुलाने मुलीच्या पोटात मारली लाथ; ती कळवळली तरीही…

यानंतर भीतीने रामरतन चौहानने प्रियकर वी.के सिंहबरोबर संगनमत करून टिकलीचा मृतदेह एका खड्ड्यात फेकून दिला होता. पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात कलम ३०२, आयपीसी ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याबाबत ‘आज तक’ने वृत्त दिलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Murder pregnant girl father boyfriend police arrested raigrah chhatigarh ssa
Show comments