गोव्यातील बागा समुद्रकिनारी एका अतिथिगृहात झेक तरुणीची हत्या करणाऱ्या तिच्याच देशातील प्रियकराला पोलिसांनी मंगळवारी रात्री अटक केली़ पाव्हेल नेऊहासल (१९) असे त्याचे नाव असून त्याने नर्केला होर्का (२४) या आपल्या प्रेयसीची हत्या केली आह़े

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बागापासून ३० किमी अंतरावर असलेल्या थिवीम रेल्वे स्थानकाजवळ मंगळवारी रात्री मापसा पोलिसांना पव्हेल जखमी आणि बेशुद्ध अवस्थेत आढळल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला़  आपण प्रेयसीसोबत राहात असलेल्या अतिथिगृहात घुसून दोन भारतीयांनी आपले अपहरण केल्याचा दावा त्याने तपासादरम्यान केला होता़  त्यानंतर कलगुट पोलिसांनी तपासणीदरम्यान अतिथिगृहाची पहाटे तपासणी केल्यानंतर होर्का खोलीत रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळली, असे पोलीस उपअधीक्षक एऩ  सी़  रायकर यांनी सांगितल़े

होर्काच्या मानेवर तीक्ष्ण शस्त्राने वार केल्याच्या खुणा होत्या़  त्यानंतर पोलिसांनी पाव्हेल याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्यानेच ही हत्या केल्याचे आणि बचावासाठी अपहरणाचे नाटय़ रचल्याचे मान्य केल़े

 

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Murdered in goa one arrested