कानपूरमधील मदरशाचे उद्घाटन करून तेथील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे, असे निमंत्रण भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांना देण्यात आले आहे. जोशी यांनी या निमंत्रणाचा स्वीकार केला असला, तरी त्या मदरशाचे आधीच उद्घाटन करण्यात आले असल्याची माहिती भाजपच्या स्थानिक नेत्यांना मिळाल्याने वाद अधिकच उफाळून आला आहे.
सदर मदरशाचे प्रमुख मोहम्मद मेहराज यांनी सांगितले की, एक महिन्यापूर्वी आपण भाजपच्या स्थानिक नेत्यांशी संपर्क साधला आणि जोशी यांनी मदरशाचे उद्घाटन करावे, अशी इच्छा व्यक्त केली.
मात्र, या मदरशाचे उद्घाटन शहरातील काझींच्या हस्ते करण्यात आले असून, तेथे विद्यार्थ्यांना शिकविण्यात येत आहे, अशी माहिती भाजपच्या स्थानिक नेत्यांना मिळाली. े. मदरशाचे आधीच उद्घाटन करण्यात आले असल्याने त्याचे पुन्हा उद्घाटन करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, त्यामुळे जोशी उद्घाटनाला जाणार नाहीत. तरीही आम्ही त्याची खतरजमा करीत आहोत, असे शहर भाजपचे अध्यक्ष सुरेंद्रनाथ मैथानी यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा