पाकिस्तानचे माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ हे ‘मुहाजीर’ (भारतातील निर्वासित) असल्यानेच त्यांना लक्ष्य केले जात आहे, असे मुत्ताहिदा कौमी मुव्हमेण्टचे (एमक्यूएम) प्रमुख अल्ताफ हुसेन यांनी म्हटले आहे.
मुशर्रफ हे मुहाजीर आहेत म्हणून तुम्ही त्यांना शिक्षा ठोठावणार असाल, तर लष्करी आदेशाचे ज्यांनी पालन केले त्यांनाही तुरुंगात टाका, इतरांना माफी का, असा सवालही हुसेन यांनी सिंध प्रांतातील हैदराबाद येथे आपल्या समर्थकांशी बोलताना केला.
माजी लष्करप्रमुख कयानी, माजी सरन्यायाधीश इफ्तिकार चौधरी आणि अन्य न्यायमूर्तीही न्यायकक्षेच्या बाहेरील कृतीचा भाग आहेत, असेही हुसेन म्हणाले. हुसेन हे लंडनमध्ये वास्तव्य करीत असले तरी ते सातत्याने दूरध्वनीवरून आपल्या समर्थकांच्या संपर्कात असतात आणि तेही स्वत: मुहाजीर आहेत.

Story img Loader