पाकिस्तानचे माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या देशद्रोहाच्या खटल्याची सुनावणी लष्करी न्यायालयात घेण्यात यावी, असा युक्तिवाद मुशर्रफ यांच्या वकिलांनी मंगळवारी विशेष न्यायालयात केला.
मुशर्रफ हे लष्कर कायद्याच्या कार्यकक्षेत येत असल्याने त्यांच्याविरुद्ध अन्य कोणत्याही न्यायालयात खटला चालविता येणार नाही, असे मुशर्रफ यांचे वकील खलिद रांझा यांनी विशेष न्यायालयात सांगितले. देशद्रोहाच्या खटल्याशी संबंधित कलमांचा लष्कर कायद्यात समावेश आहे. ज्या नागरी क्षेत्रात नागरी प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात आले असेल त्या भागांत राहणाऱ्या नागरिकांना लष्कर कायदा लागू होतो, असेही रांझा म्हणाले.
सध्या सेवेत असलेल्या अथवा निवृत्त झालेल्या लष्करी अधिकाऱ्याविरुद्ध विशेष न्यायालयात खटला चालविता येत नाही. लष्करी अधिकाऱ्याने गुन्हा केला असेल तर त्याला लष्कर कायद्यानुसार कोर्टमार्शलला सामोरे जाणे बंधनकारक आहे, असेही रांझा म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा