पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान दिवंगत बेनझीर भुत्तो यांच्या हत्येप्रकरणी पाकिस्तानचे माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांच्या न्यायालयीन कोठडीत येथील दहशतवादविरोधी न्यायालयाने १४ दिवसांची वाढ केली आहे.
न्या. चौधरी हबीब-ऊर-रेहमान यांनी मुशर्रफ यांच्या जामीन अर्जाची सुनावणी २० मेपर्यंत पुढे ढकलली आहे. भुत्तो हत्या प्रकरणाच्या खटल्याची सुनावणी २८ मे रोजी होणार आहे. मुशर्रफ यांचे वकील सलमान सफदर हे मंगळवारी झालेल्या सुनावणीला गैरहजर होते.
मुंबईवरील २६/११ चा दहशतवादी हल्ला आणि भुत्तो हत्या प्रकरणातील मुख्य वकील चौधरी झुल्फिकार अली यांची हत्या झाल्यानंतर मंगळवारी प्रथमच या खटल्याची सुनावणी घेण्यात आली.
भुत्तो यांना पुरेसे संरक्षण न दिल्याचा मुशर्रफ यांच्यावर ठपका आहे.

Story img Loader