NASA Space X Crew-9 Return Updates : २८६ दिवस अवकाशात, ४५७७ वेळा ग्रहाभोवती प्रदक्षिणा घालून आणि १९५.२ दशलक्ष किलोमीटर अंतर कापून, नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम सुरक्षितपणे घरी परतल्या आहेत. सहकारी अंतराळवीर बुच विल्मोरसोबत आठ दिवसांच्या अंतराळ मोहिमेवर गेलेल्या सुनीता विल्यम्स यांना नऊ महिने शून्य गुरुत्वाकर्षणावर राहावं लागलं. अंतराळात नेलेल्या स्टारलाइनर अंतराळयानात अनेक तांत्रिक बिघाड निर्माण झाल्यामुळे त्यांच्या परतीचा प्रवास लांबला होता. अखेर, भारतीय वेळेनुसार, पहाटे ३.३० वाजता फ्लोरिडाच्या किनाऱ्याजवळ हे दोन्ही अंतराळवीर उतरले अन् जगभर जल्लोष सुरू झाला आहे. सुनीता विल्यम्स यांचे वडील भारतीय असल्याने भारतीयांनीही त्यांच्या घरवापसीचा आनंद व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर यासंदर्भातील अनेक प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

यांसह अनेक प्रतिक्रिया सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. आजचा दिवस इतिहासात सोनेरी अक्षरांनी लिहून ठेवावा असाच आहे. त्यामुळे आजच्या दिनी अनेकजण त्यांच्या भावना व्यक्त करण्याकरता सोशल मीडियाचा आधार घेत आहेत.

Story img Loader