एका उजव्या विचारसरणीच्या संघटनेच्या नेत्याला ठार मारण्याचा कट रचल्याप्रकरणी शुक्रवारी सूरतमध्ये २७ वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. मौलवी अबुबकर टिमोल या नावाने ओळखला जाणारा आरोपी सुदर्शन टेलिव्हिजन वाहिनीचे मुख्य संपादक सुरेश चव्हाणके, भाजपाचे तेलंगणाचे आमदार राजा सिंह आणि पक्षाच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना धमकावण्याच्या कटाचा एक भाग होता, असंही पोलिसांनी सांगितलं.

सनातन संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपदेश राणा यांच्या हत्येचा कट मुस्लिम धर्मगुरूने रचला होता. त्याने राणाला १५ हून अधिक वेळा फोन करून धमकावले होते. २०१९ मध्ये लखनौमध्ये हिंदू समाज पक्षाचे अध्यक्ष कमलेश तिवारी यांची हत्या केली त्याप्रमाणे राणांनाही धमकावलं जात होतं. नेपाळ आणि पाकिस्तानमधील त्यांच्या हस्तकांनी त्याला १ कोटी रुपयांची सुपारी दिली होती, असंही पोलिसांनी सांगितलं.

Bollywood Artists News, Marathi news
Saif Ali Khan Attack : सैफ अली खानच नाही तर सलमान खान, रवीना टंडन यांच्यासह ‘या’ कलाकारांवरही झाला होता हल्ला
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Bavdhan , pistols, cartridges , koyta ,
पिंपरी : बावधनमध्ये तीन पिस्तूल, पाच काडतुसे, सहा कोयते जप्त
Ulhasnagar Bangladesh loksatta news
डोंबिवलीत कोळेगावातून बांगलादेशी महिलांना अटक
Shopkeeper shot dead in Mira Road
मिरा रोड गोळीबार प्रकरण : ११ दिवसानंतरही हल्लेखोर फरार
Rohit Pawar angry on Fadnavis Govt as after 35 days Santosh Deshmukh killers not punished Brother Dhananjay protesting
“न्याय देणारी व्यवस्था आरोपीला वाचवण्यासाठी…”, धनंजय देशमुखांच्या आंदोलनानंतर रोहित पवारांचा सरकारवर संताप
Supriya sule and pankaja Munde
Supriya Sule : “बीडची बदनामी केली जातेय”, पंकजा मुंडेंच्या टीकेवर सुप्रिया सुळेंचा पलटवार; म्हणाल्या, “कोणताही जिल्हा…”
Vaibhavi Deshmukh News
Santosh Deshmukh Daughter : संतोष देशमुख यांच्या मुलीला अश्रू अनावर, “पप्पा, जिथे असाल तिथे हसत राहा! आम्हाला माफ करा…”

हेही वाचा >> Poonch Terror Attack : भारतीय वायुसेनेच्या वाहनांवर झालेल्या हल्ल्याचा राहुल गांधींकडून निषेध; म्हणाले “हा भ्याड हल्ला…”

सध्याच्या सार्वत्रिक निवडणुकांदरम्यान जातीय सलोखा बिघडवण्यासाठी टिमोलला लवकरच राणाला ठार मारायचे होते, असे चॅट रेकॉर्डवरून दिसून आले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांची आणखी काही लक्ष्ये आहेत का हे शोधण्यासाठी सुरत पोलीस इतर यंत्रणांची मदत घेत आहेत. सुदर्शन वाहिनीचे मुख्य संपादक सुरेश चव्हाणके, भाजपाच्या माजी राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा आणि भाजपाचे तेलंगणाचे आमदार राजा सिंह यांनाही आरोपींनी धमक्या पाठवल्या आहेत.

आरोपी मूळचा महाराष्ट्रातील

मूळचा महाराष्ट्रातील नंदुरबारचा रहिवासी असलेल्या या मौलवीला शुक्रवारी सुरतमधील फुलवाडी खाडीजवळील भरीमाता रोडवरून अटक करण्यात आली. सुरतचे पोलीस आयुक्त अनुपम सिंह गहलौत यांनी शनिवारी पत्रकारांना सांगितले की, “आरोपी एका खाजगी कारखान्यात काम करतो आणि काथोर येथील मुलांना धार्मिक शिक्षण देत असे. काथोर येथील मदरशातूनही त्याने शिक्षण घेतले. आरोपी त्याच्या मोबाईलवर आंतरराष्ट्रीय क्रमांक वापरत होता. तो सोशल मीडियाच्या माध्यमातून डोगर (पाकिस्तान) आणि नेपाळमधील शहनाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्याच्या हँडलरच्या संपर्कात आला.

हेही वाचा >> नोट प्रिंटिंग प्रकरणावरून भारताने नेपाळला सुनावलं; परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर म्हणाले, “हा निर्णय…”

निधी गोळा करून शस्त्रे खरेदी करण्याचा विचार

गहलौत पुढे म्हणाले, “आम्ही त्याची चौकशी करू आणि येत्या काही दिवसांत पोलीस चौकशीतून अधिक तपशील मिळतील अशी आशा आहे. या वर्षी मार्चमध्ये राणाला धमक्या देण्यात तिमोलचा हात असल्याचे आढळून आले. आरोपीने लाओसमधील व्हर्च्युअल नंबरचा वापर करून त्याच्या ग्रुप कॉलमध्ये पाकिस्तान आणि नेपाळमधील नंबर जोडून धमक्या दिल्या. त्यांच्या फोन नंबरवर सापडलेले फोटो आणि इतर तपशील हे दाखवतात की ते (आरोपी आणि सहयोगी) एका सुरक्षित ॲपवर सुदर्शन टीव्हीचे मुख्य संपादक सुरेश चव्हाणके, राजकीय नेत्या नुपूर शर्मा यांना लक्ष्य करून धमक्या देण्याबाबत चर्चा करत होते. यासाठी ते निधी गोळा करण्याचा आणि शस्त्रे खरेदी करण्याचा विचार करत होते.”

त्याचा मोबाईल फोन तपासला असता, पोलिसांना हिंदू देवी-देवतांच्या मॉर्फ केलेल्या प्रतिमा सापडल्या. त्याला आयपीसी कलम १५३ (ए) (धर्म, वंश, जन्मस्थान, निवासस्थान, भाषा इत्यादी कारणांवरून वेगवेगळ्या गटांमध्ये शत्रुत्व वाढवणे आणि सद्भावना राखण्यासाठी प्रतिकूल कृत्ये करणे), ४६१, ४६८, ४७१ (खोटे कागदपत्र किंवा इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड म्हणून वापरणे), १२० (ब) (गुन्हेगारी कट) आणि माहिती तंत्रज्ञान कलम ६६(डी), ६७, आणि ६७(अ) अंतर्गत अटक करण्यात आली आहे.

Story img Loader