केरळातील मुस्लिम धर्मगुरू व ऑल इंडिया सुन्नी जमे याथुल उलेमा संस्थेचे सरचिटणीस शेख अबू बकर अहमद यांनी इसिस या अतिरेकी संघटनेच्या विरोधात फतवा काढला आहे.
त्यांनी म्हटले आहे की, या संघटनेला पाठिंबा देणे म्हणजे इस्लामी शरियालाच विरोध करण्यासारखे आहे. इस्लामविरोधी संघटनांच्या कृत्यांची दखल घेण्याची वेळ मुस्लिम जगतावर आली आहे. दहशतवादी गटच इस्लामचे नुकसान करीत आहे. इसिस व त्यांच्या स्वयंघोषित खिलाफती इस्लामचे प्रतिनिधित्व करीत नाहीत. इराक व सीरियात इसिस लोकांवर जे अत्याचार करतात, ते केवळ इस्लामविरोधात आहेत असे नाही तर मानवतेचेही शत्रू आहेत.

Story img Loader