Bihar Crime News : गोमांस विकल्याच्या संशयावरून काही अज्ञात तरुणांनी मुस्लीम व्यक्तिला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बिहारच्या समस्तीपूरमध्ये ही घटना घडली. याप्रकरणी एकूण १९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटकही करण्यात आली आहे. १६ ऑगस्ट रोजी ही घटना घडली. या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उजेडात आला.
तू गोमांस विकतो, म्हणत मुस्लीम व्यक्तिला मारहाण
‘द इंडियन एक्सप्रेस’ने पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, १६ ऑगस्ट रोजी दुपारी रहिमाबाद गावातील ५४ वर्षीय सरजुलुम कुरेशी नामक व्यक्ती त्याचे मटणांचे दुकान बंद करून घरी जात होता. त्यावेळी बांगरा रेल्वे क्रॉसिंगजवळ अचानक काही तरुणांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला.यावेळी त्याच्याजवळ असलेल्या पिशवीत काय? अशी विचारणा करण्यात आली आहे. त्यानंतर तू गोमांस विकतो, असं म्हणत त्यांना मारहाण करण्यात आली. तसेच त्याच्या जवळ असलेले साडेसहा हजार रुपये सुद्धा त्यांनी हिसकून घेतले.
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
दरम्यान, या ठिकाणी उपस्थित नागरिकांनी या घटनेचा व्हिडीओ मोबाईलमध्ये कैद केला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर १७ ऑगस्ट रोजी विद्यापीठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक फिरोज आलम यांनी याची दखल घेत स्व:हून तक्रार दाखल केली. याप्रकरणी १९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर २६ ऑगस्ट रोजी यांपैकी दोघांना अटक करण्यात आली. राजा आणि रोशन कुमार झा, अशी या दोघांची नावं असून ते कोणत्याही गौहत्याविरोधी संघटनेशी संबंधित नसल्याचे पोलिसांनी सांगितलं.
स्थानिक आमदारांनी घेतली पीडित व्यक्तीची भेट
या घटनेनंतर आरजेडीचे स्थानिक आमदार अख्तरुल इस्लाम शाहीन, आमदार आलोक कुमार मेहता आणि आमदार रणविजय साहू यांनी पीडित व्यक्तिच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. “हे मॉब लिंचिंगचे प्रकरण असून याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही” अशी प्रतिक्रिया आमदार अख्तरुल इस्लाम शाहीन यांनी दिली. याशिवाय समस्तीपूरचे भाजपा नेते रणजीत निर्गुणी म्हणाले, “पोलिसांनी ज्याप्रकारे मारहाण करणाऱ्यांवर कारवाई केली. तसाच कुरेशी यांच्यावरही गोमांस विक्रीचा गुन्हा व्हायला हवा होता.”