कर्नाटकमधील दक्षिण कन्नड जिल्ह्यातील पुत्तूर येथे धक्कादायक घटना घडली आहे. हिंदू मुलीशी बोलल्याबद्दल चार जणांनी एका मुस्लीम तरुणाला बेदम मारहाण केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार हल्लेखोरांना अटक केली आहे.

‘द इंडियन एक्स्प्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार, संबंधित घटना मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास घडली. घटनेच्या वेळी पीडित तरुण मोहम्मद परीस (वय-१७-१८) आपल्या कॉलेजमधील वर्गमैत्रिणीसह ज्यूस सेंटरवर आला होता. त्यांच्याबरोबर अन्य एक मुलगी होती, जी वेगळ्या धर्माची असल्याचं सांगण्यात येत आहे.

Baba Siddiqui murder case Arrest of accused financial helper Mumbai
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण: आरोपींना आर्थिक मदत करणाऱ्याला अटक
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Immediate relief, Nawab Malik, High Court,
नवाब मलिक यांना तूर्त दिलासा, मात्र….; वैद्यकीय जामिनावर असताना त्रासाविना प्रचार करत असल्याची उच्च न्यायालयाकडून दखल
Sayed Azeempeer Khadri
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर इस्लाम स्वीकारण्यास तयार होते’, काँग्रेसच्या माजी आमदाराच्या विधानामुळं खळबळ
Mithun Chakraborty gets threat from pakistani gangster Shahzad Bhatti
पाकिस्तानी गँगस्टरकडून मिथुन चक्रवर्ती यांना धमकी, मुस्लिमांबद्दल केलेल्या ‘त्या’ वक्तव्याचा उल्लेख करत म्हणाला…
Baba Siddique murder case, Five people in police custody, Baba Siddique news, Baba Siddique latest news,
पाच जणांना १९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी, बाबा सिद्दिकी हत्या प्रकरण
eknath shinde challenge to mahavikas aghadi,
“तुम्ही अडीच वर्षांत काय केलं? समोरासमोर येऊन चर्चा करा”; एकनाथ शिंदेंचं महाविकास आघाडीला थेट आव्हान!

पीडित तरुण त्याच्या वर्गमैत्रिणीबरोबर गप्पा मारत होता. यावेळी आरोपींनी त्याला बाजूला बोलावून मारहाण केली. या हल्ल्यानंतर परीस याला रुग्णालयात दाखल केलं. त्याच्यावर उपचार करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा- सातवीतील विद्यार्थ्याकडून अंदाधुंद गोळीबार, आठ शाळकरी मुलांसह सुरक्षारक्षकाचा मृत्यू

याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर पुत्तूर शहर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आणि चौघांना अटक केली. दिनेश गौडा, प्रज्वल, निशांत कुमार आणि प्रदीप अशी चार आरोपींची नावं आहेत. आरोपी गौडा हा शहरातील रिक्षाचालक आहे, तर इतर तिघेजण महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत. पोलिसांनी आरोपींवर अपहरण आणि मारहाणीसह भारतीय दंड संहितेच्या (IPC) विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला.