पीटीआय, वाराणसी
उत्तर प्रदेशातील वाराणसी जिल्ह्यातील ज्ञानवापी संकुलात भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (एएसआय) विभागाने शनिवारी दुसऱ्या दिवशीही वैज्ञानिक सर्वेक्षणाचे काम सुरू ठेवले. ते संध्याकाळी पाचपर्यंत चालले.सरकारी वकील राजेश मिश्रा यांनी ही माहिती दिली. मिश्रा म्हणाले की, शनिवारी दुसऱ्या दिवसाच्या सर्वेक्षणाच्या कामात मुस्लीम पक्षकारांकडून पाच जणही सहभागी झाले होते. दुपारी १ ते ३ पर्यंत सर्वेक्षणाचे काम भोजनासाठी थांबवल्याचे त्यांनी सांगितले.
हिंदू पक्षकारांचे वकील सुभाष चतुर्वेदी यांनी सांगितले, की सर्वेक्षण पथकाने आज मशीद संकुलात जिथे नमाज अदा केली जाते त्या मध्यवर्ती घुमट भागाचे सर्वेक्षण केले. सर्वेक्षण पथकाने ज्ञानवापी मशीद परिसरात व्यास कुटुंबाच्या ताब्यात असलेल्या तळघराचे सर्वेक्षण केले, परंतु सर्वेक्षण पथक अद्याप मुस्लिमांच्या ताब्यात असलेल्या दुसऱ्या तळघरापर्यंत पोहोचलेले नाही.
उर्वरित दोन तळघर बुजवलेली आहेत. शुक्रवारी दिवसभर चाललेल्या पाहणीदरम्यान मिश्रा हे पाहणी पथकासोबत होते. मात्र, शुक्रवारी झालेल्या सर्वेक्षणाच्या कामात मुस्लीम पक्ष सहभागी झाला नव्हता. रविवारी पहाटे ते सायंकाळी ५ या वेळेत सर्वेक्षण होणार असल्याचे त्यांनी सांगितले. हिंदू याचिकाकर्त्यां सीता साहू यांनी या आवारातून बाहेर पडून दावा केला, की ज्ञानवापी संकुलाच्या पश्चिमेकडील भिंतीवर अर्धा प्राणी आणि देवतेची मूर्ती दिसली. तळघरात तुटलेले पुतळे आणि खांबही पडलेले दिसलेमुस्लीम पक्षाचे वकील तौहीद खान यांनी सांगितले की, शनिवारी सर्वेक्षणाच्या कामात मुस्लीम पक्षकारांचे वकील अखलाक आणि मुमताज यांच्यासह पाच लोक उपस्थित होते.
मुस्लीम पक्षकारांचे सहकार्य
मुस्लीम पक्षकारांच्या वकील मुमताज म्हणाल्या, ‘‘आम्ही सर्वेक्षणाच्या कामावर समाधानी आहोत. कालपर्यंत आम्ही सर्वेक्षणाच्या कामात सहभागी नव्हतो, मात्र आज आम्ही सर्वेक्षणाच्या कामात सहभागी झालो असून, या कामात आम्ही पूर्ण सहकार्य करत आहोत. तत्पूर्वी, शुक्रवारी उशिरा अंजुमन इंतेजामिया मस्जिद समितीचे सहसचिव मोहम्मद यासीन यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करून सर्वेक्षणात सहकार्य करणार असल्याचे सांगितले होते.