मध्य प्रदेशातील सिहोर जिल्ह्यातील एका महिलेला भारतीय जनता पक्षाला मतदान तिच्या कुटुंबीयांनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मध्य प्रदेशात १७ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. तर, ३ डिसेंबर रोजी याचा निकाल समोर आला. टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

३ डिसेंबर रोजी चार राज्यांचे निकाल स्पष्ट झाले. यावेळी मध्य प्रदेशात भाजपाने स्पष्ट बहुमत मिळवले. भाजपाला यश मिळाल्याने पीडित महिलेने आनंद व्यक्त केला. यामुळे तिने भाजपाला मतदान केल्याचं स्पष्ट झाले. यावरून तिचे दीर जावेद तिच्यावर रागावले. काँग्रेसऐवजी भाजपाला मतदान दिल्याने तिला मारहाण करण्यात आली.

पीडित ३० वर्षीय तरुणी मध्य प्रदेशातील सिहोर येथील बारखेडा हसन गावची रहिवासी आहे. तिने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलिसांकडे तक्रार दाखल केली. काँग्रेस पक्षाचे कट्टर समर्थक असलेले जावेद यांनी नेहमीच भाजपाप्रती आमच्या निष्ठेबद्दल नाराजी व्यक्त करत असल्याचाही आरोप तिने केला.

हेही वाचा >> वाहनांचा मार्ग वळवला, निम्मा टोल आकारला, दीड वर्षांनी समोर आलं सत्य; मोदींच्या गुजरातमध्ये नेमकं काय घडलं?

“सुरुवातीला त्याने शिवीगाळ केली. नंतर त्याने माझ्यावर लाठीमार केला. यावेळी माझ्या पतीनेही त्याला साथ दिली”, अशी माहिती पीडितेने पोलिसांना दिली. माराहणीनंतर पीडितेने अहदमपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आरोपीविरोधात कलम २९४, ३२३, ५०६ आणि ३४ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आला आहे.

नॅशनल पसमंदा मुस्लिम फेडरेशनचे प्रदेशाध्यक्ष नौशाद खान हे पीडिता आणि तिच्या वडिलांसोबत जिल्हाधिकारी कार्यालयात गेले. त्यांनी जिल्हाधिकारी प्रवीण सिंग यांच्याकडे रीतसर तक्रार दाखल केली आणि हल्लेखोरावर कठोर कारवाई करण्याचे आवाहन केले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Muslim woman assaulted by brother in law for voting for bjp in mps sehore sgk