ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रेटीक फ्रंटचे (AIUDF) प्रमुख बदरुद्दीन अजमल यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. बलात्कार, लूटमार, दरोडा सगळ्या गुन्ह्यांमध्ये मुस्लिम नंबर वन आहेत. तसंच तुरुंगात जाण्यातही मुस्लिमांचाच पहिला क्रमांक लागतो असं त्यांनी म्हटलं आहे. हे वक्तव्य त्यांनी केल्यानंतर वाद निर्माण झाला आहे.

काय म्हटलं होतं अजमल यांनी?

बदरुद्दीन अजमल यांनी २० ऑक्टोबर रोजी आसामच्या गोलापारा जिल्ह्यात एका महाविद्यालयाच्या सभेत बोलत असताना मुस्लिम समुदाय कसा अशिक्षित असतो?, शिक्षण घेण्यात मागे पडल्याने कसा गुन्हेगारीकडे वळतो? हे सांगतिलं. तसंच या सगळ्याचा संबंध गुन्हेगारीशीही त्यांनी जोडला. ते म्हणाले, “चोरी, दरोडा, बलात्कार या सगळ्यात मुस्लिम नंबर वन आहेत. तसंच तुरुंगात जाण्याच्या बाबतीतही आपला पहिला क्रमांक लागतो. आपल्या (मुस्लिम समुदाय) मुलांकडे शाळेत किंवा महाविद्यालयात जायला वेळ नसतो. मात्र जुगार खेळण्यासाठी, दुसऱ्यांना फसवण्यासाठी वेळ असतो. जरा स्वतःच्या मनाला विचारा की हे काय करत आहात. सगळ्या चुकीच्या गोष्टींमध्ये मुस्लिम आघाडीवर आहेत आणि ही अत्यंत वेदना देणारी गोष्ट आहे.” असं त्यांनी म्हटलं होतं.

Bollywood film stars in grip of mafia extortion
चित्रपटसृष्टीतील कलाकार हल्लेखोर, खंडणीखोरांच्या निशाण्यावर?
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Saif Ali Khan And Arvind Kejriwal
Saif Ali Khan : “गुजरातच्या तुरुंगात बसलेला गुंड…” सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर लॉरेन्स बिश्नोईचे नाव घेत केजरीवालांकडून भाजपा लक्ष्य
What Sanjay Raut Said?
Sanjay Raut : संजय राऊत यांची टीका, “सैफ अली खानवर हल्ला होणं ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी…”
Traffic police and Municipal Corporation are trying to speed up traffic in Pune news
पिंपरी: खंडणीखोरांविरोधात आक्रमक; औद्योगिक तक्रार निवारण पथकामार्फत ११ गुन्हे दाखल
Haryana BJP chief Mohan Lal Badoli and Jai Bhagwan
Mohan Lal Badoli: भाजपाच्या नेत्यावर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल; पीडित तरुणीने सांगितली अत्याचाराची आपबिती
Manoj Jarange Patil Dhananjay Munde
“वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी धनंजय मुंडेंचं षडयंत्र”, मनोज जरांगेंचा थेट आरोप; म्हणाले, “जातीचं पांघरून…”
Supriya Sule
Supriya Sule : वाल्मिक कराडप्रश्नी सुप्रिया सुळे आक्रमक; ईडी आणि पीएमएलएचा उल्लेख करत थेट केंद्र सरकारला केलं लक्ष्य!

एवढंच नाही तर पुढे ते म्हणाले, “लोक चंद्रावर जात आहेत, सूर्यावर यान धाडत आहेत, पीएचडी करत आहेत. एकदा जरा पोलीस स्टेशनला जाऊन बघा तिथे तुम्हाला समजेल सर्वाधिक गुन्हेगार कोण? अब्दुल रहमान, अब्दुल रहीम, अब्दुल मजीद, बदरुद्दीन, सिराजउद्दीन अशीच नावं तिथे गुन्हेगारांच्या यादीत सापडतील. ही गोष्ट क्लेशदायक नाही का? ” अजमल यांनी केलेल्या वक्तव्यावरुन वाद निर्माण झाल्यानंतर आता त्यांनी याबाबतचं स्पष्टीकरणही दिलं आहे.

इंडिया टुडेला दिलेल्या प्रतिक्रियेत बदरुद्दीन अजमल असं म्हणाले की, “मी जगभरातल्या मुस्लिम समुदायाच्या शिक्षणाबाबत चिंता व्यक्त केली. शिक्षण घेण्याचं प्रमाण मुस्लिम समुदायात कमी आहे. आमची मुलं शिकत नाहीत याचं मला वाईट वाटतं. आमची मुलं ही उच्च शिक्षणासाठी विदेशातही जात नाही नाही. मुस्लिम बांधवांना शिक्षणाचं महत्त्व समजावं म्हणून हे वक्तव्य केलं होतं. ” तसंच ते पुढे म्हणाले, “एकीकडे ही मुलं म्हणतात की मुलींकडे पाहून त्यांचं रक्त उसळतं. मी त्यांना हे सांगू इच्छितो की इस्लाम सांगतो की तुम्ही जर घराच्या बाहेर पडलात तर तुमची नजर जमिनीकडे हवी. जर कुठल्याही मुलीकडे तुम्ही वाईट नजरेने पाहिलंत तर तुम्हाला हे माहित असलं पाहिजे की तुमच्या घरातही आया-बहिणी आहेत.” तुम्ही असा विचार केलात तर मुलींबाबत तुमच्या मनात वाईट विचार येणार नाहीत असाही सल्ला अजमल यांनी दिला.

Story img Loader