ओडिशातील मुस्लिम व ख्रिश्चनांची धार्मिक स्थळे त्यांच्या उत्पन्नाचा स्रोत तपासण्यासाठी सरकारच्या नियंत्रणाखाली ठेवावीत अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केली आहे. हिंदूंसाठी त्यासाठी धर्मादाय आयुक्त आहेत. ख्रिश्चन व मुस्लिम वाढती लोकसंख्या भौगोलिक संतुलनाच्या दृष्टीने आव्हान ठरेल असे मत पूर्व ओडिशाचे प्रांत प्रचारक समीर कुमार मोहांती यांनी स्पष्ट केले.
संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाची रांची येथे बैठक झाली. त्यामध्ये संमत झालेल्या ठरावांबाबत मोहांती यांनी माहिती दिली. ओडिशात १६ हजार मंदिरे व साडेचारशेच्या वर मठ हिंदू धर्मदाय कायद्यांतर्गत येतात. त्यामध्ये जैन व बुद्धांच्या धार्मिक स्थळांचा समावेश केल्याचे त्यांनी सांगितले. ओडिशात १९६१ ते २०११ दरम्यान हिंदूंची लोकसंख्येची टक्केवारी चार टक्क्यांनी घटून ९४ टक्के झाली. मुस्लिम व ख्रिश्चनांची लोकसंख्या वाढल्याचा दावा त्यांनी जनगणना अहवालाचा दाखला देत केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा