काही दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी मुस्लिमांना अमेरिकेत प्रवेश बंदी करण्यासंदर्भात केलेले वक्तव्य रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाच्या उमेदवारीचे दुसरे दावेदार टेड क्रुझ यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळले. भारतामध्ये मुस्लिम शांततेत राहत नाहीत का, असा प्रश्न टेड क्रुझ यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना विचारला.
अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी मिळवण्यासाठी जाहीर चर्चेच्या फेऱ्या सध्या सुरू आहेत. याचवेळी टेड क्रुझ यांनी ट्रम्प यांचे विधान मोडून काढले. ते म्हणाले, जगात लाखो मुस्लिम शांततेने राहतात. भारताचे उदाहरण घेतल्यास तिथेही मुस्मिल समाज शांततेने नांदतो आहे. अल कायदा किंवा इस्लामिक स्टेट यांचे नियंत्रण असलेल्या देशांमध्ये दिसणारे प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिसत नाहीत. मुस्लिमांना अमेरिकेत प्रवेशच नाकारणे हा काही उपाय नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, चर्चेच्या या फेरीमध्ये सहभागी झालेल्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याच बाजूने कौल दिला आणि ते या फेरीचे विजेते ठरले. ३५ टक्के मते डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाजून पडली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा