‘लव्ह जिहाद’बाबत प्रक्षोभक वक्तव्य करून विश्व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी प्राची यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे. इतकेच नव्हे तर हिंदू महिलांना चार मुले असावी, या आपल्या वक्तव्याचेही त्यांनी जोरदार समर्थन केले आहे.
‘लव्ह जिहाद’द्वारे आपल्या मुलींना जाळ्यात ओढले जात असून, ३०-४० मुलांना जन्म दिला जात आहे आणि ‘लव्ह जिहाद’ पसरविला जात आहे. हिंदुस्थानला दारूल इस्लाम बनविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असेही साध्वी म्हणाल्या.
आपण हे वक्तव्य केले तेव्हा देशात भूंकप झाल्यासारखी स्थिती झाली. चार मुलांबाबतचे वक्तव्य करून नव्या वादाला तोंड फोडले, असे आपल्याला माध्यमांच्या प्रतिनिधींनी सांगितले. मात्र केवळ चार मुले असावी, असे भाष्य केले ४० नव्हे, असेही त्या म्हणाल्या. ज्या हिंदूूंना चारपेक्षा अधिक मुले आहेत त्यांचा विश्व हिंदू परिषदेच्या वतीने सत्कार करण्यात आला तेव्हा त्या बोलत होत्या.भाजपने या वक्तव्याशी असहमती दर्शविली आहे. या भूमिकेशी पक्ष सहमत नाही आणि त्यावर चर्चा करण्यातही भाजपला रस नाही, असे पक्षाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

Story img Loader