विद्यापीठांमधील दीक्षान्त समारंभाच्या वेळी विद्यार्थ्यांच्या पेहेरावातून भारतीयत्व प्रतिबिंबित झाले पाहिजे, असे उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी म्हटले आहे.
यापूर्वी दीक्षान्त समारंभाच्या वेळी परिधान करण्यात येणाऱ्या पेहेरावावर ब्रिटिशांचा पगडा होता, मात्र आता त्या पेहेरावावर भारतीयत्वाची छाप पडली पाहिजे, असे नाईक म्हणाले. राज्यातील २५ विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते.ाही विद्यापीठांनी भारतीय पेहेरावाची सुरुवात केली असून ही स्वागतार्ह बाब आहे. कुलगुरूपदाचा कालावधी सध्याच्या तीनऐवजी पाच वर्षांचा असावा असा प्रस्ताव सरकारकडे पाठविण्यात आला आहे, असेही नाईक म्हणाले.
दीक्षान्त समारंभाच्या पेहेरावातून भारतीयत्व प्रतिबिंबित व्हावयास हवे – राम नाईक
यापूर्वी दीक्षान्त समारंभाच्या वेळी परिधान करण्यात येणाऱ्या पेहेरावावर ब्रिटिशांचा पगडा होता
First published on: 10-01-2016 at 02:24 IST
TOPICSराम नाईक
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Must be reflected nationalism ram naik