मुझफ्फरनगरमधील दंगलींच्या वेळी देण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक आदेशांचा भंग केल्याप्रकरणी केंद्रीय कृषीराज्यमंत्री संजीव बलिया यांच्याबरोबरच अन्य ६० जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़  मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये भारतेंदू सिंग आणि हुकूम सिंग या दोन भाजपच्या खासदारांचा तसेच संगीत सोम आणि सुरेश राणा या भाजप आमदारांचा आणि नरेश तिकै त आणि हरिकिशन सिंग मलिक यांचा समावेश आहे, अशी माहिती अतिरिक्त जिल्हा न्यायदंडाधिकारी इंदरमणी त्रिपाठी यांनी दिली़
त्यांच्याविरुद्ध ३१ ऑगस्ट आणि ७ सप्टेंबर या दिवशी प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन आणि भाषणांद्वारे जातीय तेढ निर्माण करणे, असे गुन्हे  दाखल करण्यात आले आहेत़  पंचायतींवर बंदीचे जिल्हा प्रशासनाचे आदेश धुडकावून आरोपींनी दोन पंचायतींमध्ये भाग घेतल्याचे त्रिपाठी यांनी सांगितल़े  
दरम्यान, या प्रकरणाची पुढील सुनावणी १६ जुलै रोजी होणार आह़े
आयोगाने ३३ पीडितांचे जबाब नोंदविले
मुझफ्फरनगर दंगलीच्या चौकशीसाठी उत्तर प्रदेश शासनाने नेमलेल्या एक सदस्यीय आयोगाने ३३ दंगल पीडितांचे जबाब मंगळवारी नोंदविले आहेत़  निवृत्त न्यायमूर्ती विष्णू सहाय या आयोगाचे सदस्य आहेत़  ७०० हून अधिक पीडितांनी आयोगासमोर प्रतिज्ञापत्रे सादर केली आहेत़, तर आयोगाने आतापर्यंत २४८ दंगल पीडितांचे जबाब नोंदविले आहेत आणि यापुढेही जबाब नोंदविणे सुरूच राहील, असे साहाय यांनी सांगितल़े ६० जणांचा बळी घेणाऱ्या आणि तब्बल ४० हजार जणांना बेघर करणाऱ्या मुझफ्फरनगर दंगलीची चौकशी करण्यासाठी ९ सप्टेंबर रोजी आयोगाची स्थापना करण्यात आली़  दोन महिन्यांच्या नियोजित कालावधीत आयोग अहवाल सादर करू शकला नाही़  त्यामुळे नोव्हेंबरमध्ये आयोगाला सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती़

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा