राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोनिया गांधी यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीला बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार गैरहजर राहिल्यामुळे राजकीय वर्तुळात निरनिराळ्या चर्चांना सुरूवात झाली होती. मात्र, माझ्या या अनुपस्थितीचा चुकीचा अर्थ काढला जात असल्याचे नितीश कुमार यांनी स्पष्ट केले आहे. मी एप्रिल महिन्यातच सोनिया गांधी यांना भेटलो होतो. बैठकीत चर्चा झालेल्या मुद्द्यावर आम्ही त्यावेळीच एकमेकांशी बोललो होतो. यावेळी त्यांनी केवळ सर्व राजकीय पक्षांना स्नेहभोजनासाठी आमंत्रित केले होते. या बैठकीला आमच्या पक्षाकडून (जदयू) शरद यादव व के.सी. त्यागी उपस्थित होते. त्यामुळे माझ्या गैरहजरीचा चुकीचा अर्थ काढला जात असल्याचे नितीश यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. एकीकडे विरोधकांच्या बैठकीला दांडी मारणारे नितीशकुमार आज (शनिवार) मालदीवचे पंतप्रधान प्रवींद जुगनौथ यांच्या स्वागतसमारंभाच्या मेजवानीत पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत सहभागी होणार आहेत. नितीशकुमारांच्या या निवडीने भाजपबरोबरील त्यांच्या कथित जवळिकीबद्दल नव्याने चर्चा सुरू झाली होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा