Sudha Murthy Viral Video : भारतीय वंशाचे ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान झाल्यानंतर भारतीयांनी जल्लोष केला होता. भारतीय वंशाचे अनेकजण परदेशात राजकीय क्षेत्रात मोठ-मोठ्या पदावर आहेत. त्यापैकीच एक म्हणजे ऋषी सुनक. गेल्यावर्षी ब्रिटनमध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांना ब्रिटनमधील सर्वांत तरुण पंतप्रधान बनण्याची संधी मिळाली. ऋषी सुनक हे इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती आणि प्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती यांचे जावई आहेत. ऋषी सुनक यांच्या सासू सुधा मूर्ती यांनी केलेले एक वक्तव्य आज इन्स्टाग्रामवर तुफान व्हायरल होत आहे.

“माझ्या मुलीने तिच्या नवऱ्याला पंतप्रधान केलं”, असं सुधा मूर्ती म्हणाल्या आहेत. “मी माझ्या नवऱ्याला उद्योगपती केलं. माझ्या मुलीने तिच्या नवऱ्याला पंतप्रधान केलं” असं त्या म्हणाल्या. “पत्नीची खूप ताकद असते. पत्नी पतीचं आयुष्य कसं बदलू शकते पाहा. पण मी माझ्या नवऱ्याला बदलू शकले नाही. मी माझ्या नवऱ्याला उद्योगपती केलं. माझ्या मुलीने तिच्या नवऱ्याला पंतप्रधान बनवलं, असं सुधा मूर्ती म्हणाल्या.

Shyam Manav comment on Ladki Bahin Yojana,
‘लाडकी बहीण योजना अर्थव्यवस्थेला चालना देणारी’, काँग्रेसच्या सभेत अंनिसचे श्याम मानव म्हणाले….
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Supriya sule on sunil tingre
Supriya Sule : “पोर्शेप्रकरणी शरद पवारांनी माफी मागावी”, सुप्रिया सुळेंनी ‘ती’ नोटीसच दाखवली, म्हणाल्या…
mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
aishwarya narkar slams netizen who writes bad comments
“आई आणि बायकोवरून…”, आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्याला ऐश्वर्या नारकरांनी सुनावलं; म्हणाल्या, “महिलांचा…”
Nitin Gadkari Umarkhed, Nitin Gadkari Kisan Wankhade,
“काँग्रेसने जातीयवाद आणि सांप्रदायिकतेच विष कालवले,” नितीन गडकरी यांची यवतमाळात टीका
Vaibhav Chavan
“अंकिता आणि आमचे दाजी…”, वैभव चव्हाणने ‘कोकण हार्टेड गर्ल’बरोबरचे शेअर केले फोटो; नेटकरी म्हणाले, “विश्वास बसत नाही…”
Amit Shah IMP Statement about CM Post
Amit Shah : ‘महायुतीचं सरकार आल्यास मुख्यमंत्री कोण?’ अमित शाह म्हणाले, “नेतृत्व…”

हेही वाचा >> अभिमानास्पद! आज मॉरिशसमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचं अनावरण; देवेंद्र फडणवीस राहणार उपस्थित

प्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती आणि इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांची कन्या अक्षता मूर्ती ही ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची पत्नी आहे. या दोघांचा विवाह २००९ मध्ये झाला. ऋषी सुनक हे भारतीय वंशांचे असले तरीही त्यांचं कुटुंबीय गेल्या १५० वर्षांपासून ब्रिटनमध्ये स्थायिक आहेत. लग्नानंतर त्यांच्या राजकीय प्रवासाला वेग आला असल्याचंही सुधा मूर्ती यांनी या व्हिडीओत म्हटलं आहे.

गुरुवारी उपवास करण्याची प्रथा

देशातील सर्वांत श्रीमंत कुटुंबात दर गुरुवारी उपवास धरण्याची प्रथा आहे. खुद्द सुधा मूर्ती यांनीच या व्हिडीओमध्ये या उपवासासंबंधित माहिती दिली आहे. त्या म्हणतात की, “दर गुरुवारी उपवास करण्याची आमच्या घरात फार पूर्वीपासून परंपरा आहे. आम्ही गुरुवारीच इन्फोसिस सुरू केली होती.” तसंच, ऋषी सुनकही धार्मिक असल्याची माहिती सुधा मूर्ती यांनी या व्हिडीओच्या माध्यमातून दिली आहे. “गेली १५० वर्षे ते इंग्लडमध्ये राहत असले तरीही ते फार धार्मिक आहेत”, असं सुधा मूर्ती म्हणाल्या. तसंच, “माझ्या सुनेची आई दर सोमवारी उपवास धरतात. परंतु, माझी सून गुरुवारीच उपवास करते”, असंही त्यांनी पुढे स्पष्ट केलं.