दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी त्यांच्या वडिलांवर गंभीर आरोप केले आहे. एका कार्यक्रमात बोलताना त्या म्हणाल्या की, “माझे वडील माझं लैंगिक शोषण करायचे. तसेच रागात ते मला खूप मारहाणदेखील करायचे.”
स्वाती मालीवाल म्हणाल्या की, “मला आठवतंय की, माझे वडील माझं लैंगिक शोषण करायचे. ते घऱी यायचे तेव्हा मला खूप भिती वाटायची. मी अनेक रात्री खाटेखाली लपून घालवल्या आहेत. मी घाबरून थरथर कापायचे. तेव्हा मी विचार करायचे की, मला असं काय करता येईल ज्याने मुलींवर अत्याचार करणाऱ्या या लोकांना धडा शिकवता येईल. माझे वडील घरी यायचे तेव्हा ते खूप रागात असायचे. त्यांच्या मनाला वाटेल तसं वागायचे.”
मालीवाल म्हणाल्या की, “माझ्या वडिलांना राग आल्यावर ते कोणत्याही कारणाशिवाय माझे केस पकडायचे आणि मला भिंतीवर आपटायचे. मी जखमी व्हायचे, जखमेतून भळाभळा रक्त वाहायचं. खूप दुखायचं, माझी तडफड व्हायची. परंतु हे असंच सुरू राहीलं.”
कुटुंबाची मदत मिळाली
बालवयात मनावर झालेल्या आघातांनंतर (चाइल्डहूड ट्रॉमा) त्यातून बरी होण्यास मला कुटुंबाने खूप मदत केली. माझ्या आयुष्यात माझी आई, माझे मावशी-काका, आजी-आजोबा (आईचे आई-वडील) नसते तर कदाचित मी त्या चाइल्डहूड ट्रॉमामधून बाहेर पडू शकले नसते. मी आज तुमच्यामध्ये उभी राहू शकले नसते, हे कार्य करू शकले नसते.
हे ही वाचा >> व्यसनमुक्ती केंद्रात रुग्णाला दीड तास मारहाण, मग प्रायव्हेट पार्ट पेटवले, आजारामुळे गेल्याचे सांगत अंत्यविधी उरकले, पण…
मला समजलं आहे की, जेव्हा खूप अत्याचार होतो तेव्हा मोठा बदल होतो. त्या अत्याचारांमुळे तुमच्या आत मोठी आग पेटते. या आगीला तुम्ही केवळ योग्य वाट करून दिली तर तुम्ही आयुष्यात खूप मोठमोठी कामं करू शकता.