ऑस्ट्रेलियात लिंगभेदावरून वादळी चर्चा सुरू असतानाच तिबेटचे धार्मिक नेते दलाई लामा यांनी आपली उत्तराधिकारी महिला असेल असे संकेत दिले आहेत.
दलाई लामा ऑस्ट्रेलियाच्या दहा दिवसांच्या भेटीवर आहेत. सिडनी, मेलबोर्न आणि डारविन येथे त्यांची भाषणे होणार आहेत. ऑस्ट्रेलियात पंतप्रधान ज्युलिया गिलार्ड यांच्या विरोधात विरोधी पक्षनेत्यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याने वाद सुरू आहे. त्यावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. जगात सध्या असमानतेच्या मुद्दय़ावरून नैतिक पेच निर्माण झाला आहे. अशावेळी पदाला न्याय देईल अशा खंबीर नेतृत्वाची गरज आहे. त्यावेळी जैवशास्त्रीयदृष्टय़ा महिलांकडे अधिक नेतृत्व क्षमता आहे. त्या अधिक संवेदनशील असतात. आपले वडील अधिक रागीट होते, त्यातून अनेक वेळा मार खावा लागला, त्यावेळी आई कुशलतेने मार्ग काढत, असे दलाई लामा यांनी सांगितले. नेतृत्व करण्याची महिलांकडे क्षमता आहे, त्यामुळे गरज भासल्यास आपला उत्तराधिकारी महिला असू शकेल, असे दलाई लामा यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा