गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी आज सोमवार एका कार्यक्रमात केंद्रीय नेता होण्याची धमक अजून माझ्यात आलेली नसल्याचे म्हटले.
राजकीय जीवनात भविष्यात पंतप्रधान होण्याची वेळ आली याबाबत तुम्ही काय विचार करता? या प्रश्नाच्या उत्तरात पर्रिकर म्हणाले, “केंद्रात काम करण्यासाठी केवळ प्रामाणिकपणा हा गुणधर्म अंगी असणे गरजेचे नाही. इतरही काही महत्वाच्या गोष्टी आत्मसात करण्याची गरज असते. मला स्वत:ला असे वाटते की, त्यासाठी अजून मी तयार झालेलो नाही. केंद्रात काम करण्यासाठीची लागणारी धमक अजून माझ्यात आलेली नाही.” परंतु, योग्य वेळी केंद्रात काम करण्याची मला संधी मिळाली तर, मी नक्की पाऊल उचलेन असेही पर्रिकर म्हणाले. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: My temperament is not of a central leader parrikar