Myanmar Earthquake Videos Skyscraper in Bangkok Collapses : म्यानमारमध्ये शुक्रवारी ७.७ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे हादरे बसले आहेत. या जोरदार भूकंपानंतर एकच हाहाकार उडाल्याचे पाहायला मिळाले. या भूकंपानंतर लोक धावपळ करताना तसेच इमारती आणि पूल कोसळतानाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशाच एका व्हिडीओमध्ये बँकॉकमधील एक बांधकाम सुरू असलेली गगनचुंबी इमारत कोसळताना पाहायला मिळत आहे. दरम्यान म्यानमार येथील भूकंपाचे थायलंडसह शेजारील अनेक देशांमध्ये धक्के जाणवले.

एएफपीने दिलेल्या माहितीनुसार ही इमारत कोसळल्यानंतर त्याखाली ४३ लोक अडकले आहेत. दरम्यान म्यानमार येथे आलेल्या या भूकंपानंतर सोशल मीडीयावर याचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये रस्त्यांवरील लॅम्पपोस्ट जोरजोरात हलताना दिसत आहेत. तर याच व्हिडीओमध्ये दूर अंतरावर एक उंच इमारत पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळताना दिसत आहे.

रस्त्यावरून जात असलेल्या प्रवाशांच्या कॅमेऱ्यामध्ये देखील हा भयानक व्हिडीओ कैद झाला आहे, ज्यामध्ये गगनचुंबी इमारत कोसळताना दिसत आहे.

बँकॉकमधील बांधकाम सुरू असलेली गगनचुंबी इमारत कोसळत असताना लोक स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धावत असल्याचे दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.

काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, म्यानमार मधील Ava देखील भूकंपामुळे कोसळला आहे.

म्यानमारमध्ये शुक्रवारी आलेल्या या शक्तिशाली भूकंपानंतर समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये एका उंच इमारतीवल स्विमिंग पूलमधील पाणी घाली पडताना दिसत आहे.

नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने दिलेल्या माहितीनुसार सकाळी ११.५० वाजता १० किमी खोलीवर भूकंपाचे धक्के बसले. दरम्यान या शक्तिशाली भूकंपात कोणत्याही जि‍वितहानी बद्दलची अद्याप माहिती समोर आलेली नाही. दरम्यान बँकॉक येथे भूकंपानंतर आपत्कालीन परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे.