Airstrike on Myanmar Village : म्यानमार सैन्याने मंगळवारी (११ एप्रिल) एका गावावर केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये लहान मुलं, पत्रकारांसह एकूण १०० लोकांचा मृत्यू झाला आहे. या गावात म्यानमारच्या विरोधी गटाच्या कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात नागरिक सहभागी झाले होते. या घटनेने जगभरात खळबळ उडाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, म्यानमार सैन्याच्या फायटर जेटने मंगळवारी सकाळी ८ वाजता १५० लोक जमा झालेल्या ठिकाणी बॉम्ब टाकला. या हल्ल्यात जवळपास १०० लोकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये सरकारविरोधी गटाच्या स्थानिक नेत्यांसह सामान्य महिला नागरिक आणि २०-३० लहान मुलांचाही समावेश आहे.

एअर स्ट्राईकनंतर एक दीड तासाने एका हेलिकॉप्टरने गोळीबार

एअर स्ट्राईकनंतर एक दीड तासाने एका हेलिकॉप्टरने गोळीबार केला. म्यानमार सरकारने या हल्ल्याचं वार्तांकन करण्यास मनाई केल्याने या हल्ल्यात नेमके किती मृत्यू झालेत याचा निश्चित आकडा समोर येऊ शकलेला नाही.

छायाचित्र सौजन्य – एपी

हेही वाचा : विश्लेषण : युक्रेन युद्धाबाबत अमेरिकेची ‘गोपनीय’ कागदपत्रे कुणी फोडली? या माहितीचा युद्धावर काय परिणाम होईल?

म्यानमारमधील लष्करी सरकारची भूमिका काय?

एफपी न्यूजनुसार, म्यानमार सरकारने या हल्ल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. म्यानमारमधील लष्करी सरकारचा प्रवक्ता म्हणाला, “त्या गावात पिपल्स डिफेन्स फोर्सच्या कार्यालयाचं उद्घाटन होतं. ही सरकारविरोधी सशस्त्र संघटना आहे. २०२१ मध्ये लोकनियुक्त सरकार पाडल्यानंतर ही संघटना म्यानमारमध्ये आपले हातपाय पसरत आहे.” म्यानमार सैन्याने या मृत्यांना सरकारविरोधी संघटना जबाबदार असल्याचा आरोप केला आहे.

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार प्रमुखांनी हा भयभीत करणारा हल्ला असल्याचं म्हटलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Myanmar military airstrikes on village many dead including children journalist pbs