म्यानमारमध्ये बहुसंख्य असलेले बौद्ध आणि अल्पसंख्य मुस्लीम यांच्यात वर्षभरापासून तीव्र संघर्ष सुरू असतानाच सत्ताधाऱ्यांच्या नव्या आदेशामुळे हा संघर्ष तीव्र होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. येथील रोहिंग्या या मुस्लीम समाजातील कोणीही दोनपेक्षा अधिक अपत्यांना जन्म देऊ नये, असे धोरण सरकारने आखले आहे. म्यानमारमध्ये लोकशाही रुजावी, यासाठी प्रदीर्घ लढा देणाऱ्या विरोधी पक्षनेत्या स्यू की यांनी या धोरणाचा निषेध केला आहे.
म्यानमारमध्ये मुस्लीम अल्पसंख्य असले तरी तेथील काही भागांत मुस्लिमांचे प्रमाण जवळपास ९५ टक्के आहे. सध्याच्या सरकारपूर्वी अस्तित्वात असणाऱ्या लष्करी राजवटीने मुस्लिमांसाठी विशिष्ट धोरण आखले होते, त्यानुसार मुस्लिमांनी दोनपेक्षा अधिक अपत्यांना जन्म देऊ नये, असा नियम करण्यात आला होता. या नियमामुळे मुस्लिमांमध्ये तीव्र नाराजी होती. सत्तापालट होऊन लोकशाही आल्यानंतरही हे धोरण कायम राखण्यात येईल, असे संकेत सरकारने दिल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.
या धोरणाचा तपशील अद्याप घोषित करण्यात आलेला नाही, मात्र त्यास आतापासून मोठा विरोध होत आहे. मुस्लीम नेते, मानवाधिकार कार्यकर्ते यांच्यासह स्यू की यांनीही याचा निषेध केला आहे. यात जर तथ्य असेल तर ते केवळ मानवाधिकाराचेच नव्हे तर कायद्याचेही उल्लंघन आहे, अशी प्रतिक्रिया की यांनी व्यक्त केली.
म्यानमारमधील मुस्लिमांवर कुटुंबनियोजनाची सक्ती?
म्यानमारमध्ये बहुसंख्य असलेले बौद्ध आणि अल्पसंख्य मुस्लीम यांच्यात वर्षभरापासून तीव्र संघर्ष सुरू असतानाच सत्ताधाऱ्यांच्या नव्या आदेशामुळे हा संघर्ष तीव्र होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. येथील रोहिंग्या या मुस्लीम समाजातील कोणीही दोनपेक्षा अधिक अपत्यांना जन्म देऊ नये, असे धोरण सरकारने आखले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 29-05-2013 at 12:57 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Myanmar proposes family planning to control muslims