म्यानमार सैन्याकडून त्यांच्या जमिनीवरुन भारतविरोधी बंडखोर कारवाया करणाऱ्या गटांविरोधात मोठी कारवाई केली जात आहे. सरकारमधील सूत्रांनी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, “म्यानमारमध्ये छावणी उभारुन भारतविरोधी कारवाया करणाऱ्या बंडखोर गटांवर म्यानमारच्या लष्कराने सुरक्षा यंत्रणांनी कारवाई केली आहे”.

दरम्यान भारतीय यंत्रणाही म्यानमारमधील सुरक्षा यंत्रणांच्या संपर्कात आहेत. “काही दिवसांपूर्वी पिपल्स लिबरेशन आर्मीकडून (PLA) आसाम रायफल्सचे कर्नल आणि त्यांच्या कुटुंबाची हत्या करण्यात आली होती. त्यामुळे PLA तसंच यासारख्या दहशतवादी गटांवर कारवाई करण्यासाठी भारतीय यंत्रणा म्यानमारमधील यंत्रणांच्या संपर्कात आहेत,” असंही त्यांनी सांगितलं आहे.

Thane Citizens, Thane Citizens Protest Aggressive Bike Towing, Police Seek Rule Adherence, thane news,
टोईंग कारवाईच्या त्रासामुळे ठाणेकर हैराण ठाण्यातील सुजान नागरिकांचे टोईंगविरोधात आंदोलन, जागोजागी जनजागृती
chinese telecom equipment used by pakistani terrorists
पाकिस्तानी दहशतवाद्यांकडे चीनची दूरसंचार उपकरणे
Suspected terrorist killed in Russian prison operation by security forces
रशियाच्या तुरुंगात ओलीसनाट्य; सुरक्षा दलांच्या कारवाईत संशयित दहशतवादी ठार
palestine pm letter to pm narendra modi
“मोदीजी आता तुम्हीच…”, इस्रायल-हमास युद्धादरम्यान पॅलेस्टाईनच्या पंतप्रधानांचे पत्र
Terrorists Attack
जम्मू काश्मीरमध्ये तीन दिवसांत दहशतवादी हल्ल्याची तिसरी घटना; डोडामध्ये लष्कराच्या तळावर गोळीबार, १ दहशतवादी ठार
reasi terror attack combing operation underway
चौकशीसाठी २० जण ताब्यात; रियासी हल्ल्यातील दहशतवाद्यांचा तपास अजूनही सुरू
reasi terror attack combing operation underway
चौकशीसाठी २० जण ताब्यात; रियासी हल्ल्यातील दहशतवाद्यांचा तपास अजूनही सुरू
A constable-rank CISF officer allegedly slapped Kangana at Chandigarh Airport
कंगना रणौत यांना विमानतळावर CISF च्या महिलेने थोबाडीत मारल्याचा आरोप, पोलिसांनी घेतलं ताब्यात

दुसरीकडे भारतीय लष्करदेखील म्यानमारमधील लष्कराच्या संपर्कात असून नुकतंच भारताविरोधी बंडखोरांना भारतीय यंत्रणांकडे सोपवण्यात आलं आहे. विशेष विमानाने या पाच जणांना आणण्यात आल्याची सुत्रांची माहिती आहे.

या बंडविरोधी गटांमुळे किती जणांना जीव गमवावा लागला आहे याची माहिती अद्याप मिळालेली नाही. गतवर्षी १३ नोव्हेंबरला करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यात पाच जवान शहीद झाले होते. यामध्ये आसाम रायफल्सच्या कमांडिंग अधिकाऱ्याचा समावेश होता.

४६ आसाम रायफल्सचे कमांडिग ऑफिसर कर्नल विप्लव त्रिपाठी यांच्यासह त्यांचा मुलगा, पत्नी आणि इतर चार जवानांना भारत-म्यानमार सीमेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आपला जीव गमवावा लागला होता. याआधी भारताने डोग्रा रेजिमेंट बटालियचे २० जवान हल्ल्यात शहीद झाल्यानंतर म्यानमारमध्ये सर्जिकल स्ट्राइक केला होता.