म्यानमार सैन्याकडून त्यांच्या जमिनीवरुन भारतविरोधी बंडखोर कारवाया करणाऱ्या गटांविरोधात मोठी कारवाई केली जात आहे. सरकारमधील सूत्रांनी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, “म्यानमारमध्ये छावणी उभारुन भारतविरोधी कारवाया करणाऱ्या बंडखोर गटांवर म्यानमारच्या लष्कराने सुरक्षा यंत्रणांनी कारवाई केली आहे”.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान भारतीय यंत्रणाही म्यानमारमधील सुरक्षा यंत्रणांच्या संपर्कात आहेत. “काही दिवसांपूर्वी पिपल्स लिबरेशन आर्मीकडून (PLA) आसाम रायफल्सचे कर्नल आणि त्यांच्या कुटुंबाची हत्या करण्यात आली होती. त्यामुळे PLA तसंच यासारख्या दहशतवादी गटांवर कारवाई करण्यासाठी भारतीय यंत्रणा म्यानमारमधील यंत्रणांच्या संपर्कात आहेत,” असंही त्यांनी सांगितलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Myanmarese forces carrying out operations against anti india insurgent groups on their soil sgy
First published on: 14-01-2022 at 14:08 IST