लैंगिक अत्याचाराप्रकरणी अटकेत असलेले स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू आसाराम बापू आणि त्यांचा मुलगा नारायण साई अंधश्रद्धेपोटी लाल टोपी आणि डोळ्यात काजळ घालत असल्याचे उघड झाले आहे.
इतकेच नाही तर, आसाराम पिता-पुत्रांनी आतापर्यंत अंधश्रद्धेवर विश्वास ठेवून कोट्यावधी रुपये उधळले असल्याचा खुलासा आसाराम बापूंचा माजी सेवक राहुल सचान यांनी केला आहे.
नारायण साईची बलात्काराची कबुली
राहुल सचान यांच्या म्हणण्यानुसार, आसाराम बापू आणि नारायण साई या दोघांचाही काळ्या जादूवर प्रबळ विश्वास होता. त्याचे प्रतिक म्हणून ते लाल टोपी घालतात. तसेच कोणाची नजर न लागण्याच्या उद्देशाने डोळ्यात काजळही भरतात. या दोघांनी आतापर्यंत अनेक अंधश्रद्धांवर विश्वास ठेवून त्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च केले आहेत. तसेच याच काळ्या जादूवर विश्वास ठेवून कारागृहाबाहेर येण्याची त्यांची खात्री आहे.
कारागृहात नारायण साईला हवी ‘व्हीआयपी’ सेवा
आसाराम बापू आणि नारायण साई वापरत असलेल्या लाल टोप्यांवर तब्बल लाखभर मंत्रांचा जप करण्यात आला असल्याचे राहुल सचान यांनी सांगितले.
आसाराम बापूंच्या ‘लाल टोपी’मागचे रहस्य..
लैंगिक अत्याचाराप्रकरणी अटकेत असलेले स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू आसाराम बापू आणि त्यांचा मुलगा नारायण साई अंधश्रद्धेपोटी लाल टोपी आणि डोळ्यात काजळ घालत असल्याचे उघड झाले आहे.
आणखी वाचा
First published on: 19-12-2013 at 02:39 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mystery behind asaram and narayan saiands red cap