इतकेच नाही तर, आसाराम पिता-पुत्रांनी आतापर्यंत अंधश्रद्धेवर विश्वास ठेवून कोट्यावधी रुपये उधळले असल्याचा खुलासा आसाराम बापूंचा माजी सेवक राहुल सचान यांनी केला आहे.
नारायण साईची बलात्काराची कबुली
राहुल सचान यांच्या म्हणण्यानुसार, आसाराम बापू आणि नारायण साई या दोघांचाही काळ्या जादूवर प्रबळ विश्वास होता. त्याचे प्रतिक म्हणून ते लाल टोपी घालतात. तसेच कोणाची नजर न लागण्याच्या उद्देशाने डोळ्यात काजळही भरतात. या दोघांनी आतापर्यंत अनेक अंधश्रद्धांवर विश्वास ठेवून त्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च केले आहेत. तसेच याच काळ्या जादूवर विश्वास ठेवून कारागृहाबाहेर येण्याची त्यांची खात्री आहे.
कारागृहात नारायण साईला हवी ‘व्हीआयपी’ सेवा
आसाराम बापू आणि नारायण साई वापरत असलेल्या लाल टोप्यांवर तब्बल लाखभर मंत्रांचा जप करण्यात आला असल्याचे राहुल सचान यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा