अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने मंगळावर पाठविलेल्या ‘ऑपॉच्र्युनिटी रॉव्हर’ या यानाच्या पुढे अचानक एक विचित्र दगड आला आह़े  आतापर्यंत कधीही न पाहिलेल्या या गूढ दगडामुळे शस्त्रज्ञदेखील भांबावून गेले आहेत़
अगदी काही दिवसांपर्यंत मंगळाच्या सपाट असणाऱ्या पृष्ठभागावर अचानक हा गूढ दगड उत्पन्न झाला आह़े  रॉव्हरने या दगडाचे मोजमाप घेतल्यानंतरही, हा दगड कुठून उत्पन्न झाला याबाबत काहीच अंदाज व्यक्त करता येत नसल्यामुळे अंतराळतज्ज्ञही चक्रावले आहेत़  खराब हवामानामुळे या भागाची छायाचित्रे सुमारे महिनाभर रॉव्हरला काढता येत नव्हती़
नासाने मंगळ मोहिमेबाबतचा एक अहवाल नुकताच प्रसिद्ध केला़  त्यात या गूढ दगडाची माहिती देण्यात आली आह़े  या मोहिमेतील शास्त्रज्ञ स्टेव्ह स्क्वेयर्स यांनी सांगितले की, मंगळ सतत आपल्याला नवनवीन गोष्टी दाखवित आह़े  समोर आलेल्या या गूढ दगडाची किनार अगदी पांढरी आहे आणि मधोमध एक गडद लाल रंग आह़े  तो एका मोठय़ा जेली डोनॅटसारखा दिसतो़