तमिळनाडूतील तिरुवल्लूर जिल्ह्यातील कावरपेट्टई रेल्वे स्थानकावर दरभंगा एक्सप्रेसने मालगाडीला धडक दिली आहे. या अपघातात दरभंगा एक्स्प्रेसचे तीन डबे रुळावरून घसरले आहेत. तसेच दोन डब्यांना आगही लागली आहे. शुक्रवारी ९ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच रेल्वे तसेच अग्निशनदलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

हेही वाचा – Railway Employees Arrested : धक्कादायक! वरिष्ठांकडून स्वतःचं कौतुक करून घेण्यासाठी रेल्वेच्या कर्मचाऱ्यांकडून ट्रॅक फेल करण्याचा प्रयत्न; तिघांना अटक

दक्षिण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, यात काही प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांना जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार मालगाडी कावराईपेट्टई रेल्वे स्थानकावर उभी असताना दरभंगा एक्सप्रेसने मागून या मालगाडीला धडक दिली. यात एक्सप्रेसचे तीन डबे रुळावरून खाली घसरले. तसेच दोन डब्यांना आग लागली. ही एक्सप्रेस म्हैसूरवरून दरभंगाच्या दिशेने जात होती.

हेही वाचा – एक डुलकी, एक अपघात! मुंबई लोकलमध्ये झोप लागताच माणसाचा गेला तोल अन्…, VIDEO पाहून बसेल धक्का

या अपघाताची माहिती मिळताच, रेल्वे पोलीस आणि इतर अधिकारी तसेच अग्निशनदलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. तसेच त्यांनी रेल्वेच्या डब्यांना लागलेली आग विझवण्याचे प्रयत्न केले. प्राथमिक माहितीनुसार, या अपघातात १० प्रवाशी जखमी झाले आहेत. तर मालगाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अग्निशमन दलाबरोबरच एनडीआरएफ तसेच एसडीआरएफचे पथकही घटनास्थळी दाखल झाले आहे.