राज्यसभेची उमेदवारी न दिल्याच्या कारणावरून नितीशकुमारांच्या संयुक्त जनता दलातील(जेडीयू) एन.के. सिंग शनिवारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. नितीशकुमार यांच्याकडून राज्यसभेसाठी उमेदवारी नाकारताना देण्यात आलेल्या वागणुकीमुळे आपण नाराज असल्याचे सिंग यांनी सांगितले. तसेच भाजपशी काडीमोड घेतल्यानंतर आपले अस्तित्व टिकविण्याच्या नादात नितीशकुमारांचे विकासाकडे दुर्लक्ष झाल्याची टीकासुद्धा त्यांनी केली. केंद्राकडून बिहार राज्याला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी नितीशकुमारांच्या बरोबरीने आपण आघाडीवर असल्याचेसुद्धा एन.के. सिगं यांनी स्पष्ट केले. आपण जेडीयू पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असून यासंबंधी स्पष्टीकरण देणारे एक पत्रसुद्धा मुख्यमंत्री नितीशकुमार यांना पाठविल्याची माहिती सिंग यांनी दिली आहे. एन.के. सिंग यांनी राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय पातळीवर बिहारची प्रतिमा सुधारण्यासाठी खूप प्रयत्न केले असून त्यांच्या प्रवेशामुळे भाजपला निश्चितच फायदा होईल असे भाजप नेते सुशीलकुमार मोदी यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Mar 2014 रोजी प्रकाशित
जेडीयुचे एन.के. सिंग भाजपमध्ये प्रवेश करणार
राज्यसभेची उमेदवारी न दिल्याच्या कारणावरून नितीशकुमारांच्या संयुक्त जनता दलातील(जेडीयू) एन.के. सिंग शनिवारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
First published on: 22-03-2014 at 11:17 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: N k singh to join bjp today says nitish junked development