भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष म्हणून एन. श्रीनिवासन कार्यरत राहू शकतात. मात्र, इंडियन प्रिमिअर लीगशी संबंधित कोणत्याही विषयात त्यांनी सहभाग घेऊ नये, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिला. श्रीनिवासन यांच्या बीसीसीआयच्या अध्यक्षपदावर कायम राहण्याविरोधात बिहार क्रिकेट मंडळाने (कॅब) सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावरील सुनावणीवेळी न्यायालयाने हा निर्णय दिला.
आयपीएल स्पॉट फिक्सिंगप्रकरणी चौकशी करण्यासाठी नेमावयाच्या समितीची रचना कशी असेल आणि तिच्या मर्यादा काय असतील, हे सर्व बीसीसीआय आणि कॅब यांनी एकत्रितपणे ठरवावे, असेही न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाने देशातील क्रिकेट मंडळांची शिखर संस्था असलेल्या बीसीसीआयच्या कारभारावरही टीका केली. याप्रकरणी पुढील सुनावणी सात ऑक्टोबरला होणार आहे.

Story img Loader