सध्या देशात कांद्याचे दर चांगलेच कडाडले असून देशांतर्गत बाजारातील कांद्याचे दर नियंत्रणात राहावे आणि निर्यात कमी व्हावी या उद्देशाने केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यात दरात वाढ केली आहे. त्यामुळे आता कांद्याचा कमीत कमी निर्यात दर प्रति टन ९०० डॉलर इतका निश्चित केला आहे.
गेल्या महिन्यात १४ ऑगस्ट रोजी केंद्र सरकारने कांद्याचा कमीत कमी निर्यात दर प्रति टन ६५० डॉलर इतका ठेवला होता. त्यामुळे कांद्याच्या निर्यातीत घट झाली होती. आता निर्यात दरात आणखी वाढ झाल्यामुळे निर्यातीला आळा बसेल. त्यामुळे सर्व प्रकारच्या कांद्याच्या निर्यातीसाठी प्रति टन कमीत कमी दर ९०० डॉलर इतका असल्याचे परकीय व्यापार महासंचालकांनी आपल्या अधिसूचनेत म्हटले आहे.
किरकोळ बाजारात कांद्याचे दर प्रति किलो ७० ते ८० रुपये आहेत. कांद्याचे दर नियंत्रणात राहावे यासाठी सर्व राज्यांना कांद्याची साठेबाजी रोखण्यासाठी कडक पावले उचलण्याचेआदेश दिले.
केंद्राने कांद्याचा निर्यात दर वाढवला
सध्या देशात कांद्याचे दर चांगलेच कडाडले असून देशांतर्गत बाजारातील कांद्याचे दर नियंत्रणात राहावे आणि निर्यात कमी व्हावी या उद्देशाने केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यात दरात वाढ केली आहे.
First published on: 20-09-2013 at 12:07 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nafed suggests increase in onion mep to 900tonne