बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना नागपुरातून दिलासा देणारी बातमी मिळाली आहे. धीरेंद्र शास्त्री गेल्या आठवड्यात नागपूर येथे येऊन गेले. त्यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने त्यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीत म्हटलं होतं की, हे बाबा अंधश्रद्धा पसरवत आहेत. अनिसचे श्याम मानव यांच्या तक्रारीनंतर धीरेंद्र शास्त्री यांच्या व्हिडीओंची तपासणी करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या व्हिडीओंवर पोलिसांचा कोणताही आक्षेप नाही. अनिसने दिलेल्या व्हिडीओंपैकी बरेचसे व्हिडीओ हे नागपूरच्या बाहेरचे आहेत. अंधश्रद्धेला खतपाणी घालेल असं वक्तव्य शास्त्री यांनी नागपुरात केलं नव्हतं. त्यामुळे शास्त्री यांना याप्रकरणी नागपूर पोलिसांकडून क्लीन चीट देण्यात आली आहे. ही क्लीन चीट मिळतात धीरेंद्र शास्त्री म्हणाले की, “सनातनचा प्रचार करणं ही काही अंधश्रद्धा नाही.”

हे ही वाचा >> धीरेंद्र कृष्ण महाराजांची ‘चमत्कारिक चिठ्ठी’ आहे तरी काय? माईंड रीडरचा थक्क करणारा Video होतोय Viral

श्याम मानव यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास केला. पोलीस अधिकाऱ्यांनी तपासानंतर बुधवारी म्हटलं की, “आमच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव नाही. धीरेंद्र शास्त्रींविरोधात जी तक्रार आली होती आम्ही ते व्हिडीओ ट्रान्सस्क्रिप्ट केले आणि बारकाईने पाहिले. तक्रारीत अनेक वक्तव्ये नमूद करण्यात आली होती, ज्यापैकी बरीचशी वक्तव्ये धीरेंद्र शास्त्री यांनी नागपूर बाहेर केली आहेत. तसेच नागपुरात ते जे काही बोलले तो व्हिडीओ देखील आम्ही पाहिला आहे. यामध्ये ते कोणतंही आक्षेपार्ह वक्तव्य करताना दिसले नाहीत.”

हे ही वाचा >> शिक्षक नव्हे हैवान! परवानगीशिवाय पाणी प्यायला म्हणून दात पडेपर्यंत विद्यार्थ्याला बदडलं; जिल्हाधिकारी म्हणाले, “असा…”

श्याम मानव न्यायालयात दाद मागू शकतात

दरम्यान, पोलिसांनी सांगितलं की, “याचिकाकर्ते याप्रकरणी न्यायालयात जाऊ शकतात. धीरेंद्र शास्त्री यांचे ६ तासांचे व्हिडीओ होते, हे व्हिडीओ ट्रान्सस्क्रिप्ट करण्यास वेळ लागला. सर्व व्हिडीओ बारकाईने पाहून आम्ही या निर्णयावर पोहोचलो आहोत, या व्हिडीओंमध्ये शास्त्री यांचा कोणताही अपराध दिसत नाही.”

हे ही वाचा >> ९ वर्षांपूर्वी मेलेला नवरा जिवंत? आवडत्या हॉटेलमध्ये खात होता चिकन कोरमा, बायकोने पाहिलं अन्…

धीरेंद्र शास्त्रींनी केला हल्लाबोल

नगापूर पोलिसांकडून दिलासा मिळताच बागेश्वर धाममध्ये उत्सवासारखं वातावरण आहे. यानंतर धीरेंद्र शास्त्री यांनी श्याम मानव यांच्यावर हल्लाबोल केला आहे. शास्त्री म्हणाले की, “हनुमान चालीसाचा प्रचार करणे ही कसली अंधश्रद्धा? आमचा कायदा आणि संविधानावर विश्वास आहे. सनातनचा प्रचार करणे ही कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा नाही. हिंदू राष्ट्र म्हणजेच सर्वांचं राज्य.”