पीटीआय, चंडीगड

हरियाणाचे नवे मुख्यमंत्री म्हणून नायबसिंह सैनी यांनी गुरुवारी शपथ घेतली. पंचकुला येथे झालेल्या या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित होते. राज्यपाल बंडारु दत्तात्रय यांनी सैनी यांना पद व गोपनियतेची शपथ दिली. दरम्यान, पंचकुला येथील दसरा मैदानावर शपथविधी सोहळ्याच्या निमित्ताने भाजपने जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

इतर मागासवर्गीय समाजाचे नेते असलेले सैनी हे हरियाणाचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत. वाल्मिकी जयंती दिनी हा सोहळा आयोजित करून भाजपने दलित समाजात वेगळा संदेश दिल्याचे मानले जाते. पक्षाचे ज्येष्ठ आमदार अनिल विज तसेच कृष्णलाल पवार, राव नरवीरसिंह जाट नेते महिपाल धांडा, विपुल गोयल, अरविंद शर्मा, श्यामसिंह राणा, रणबिर गंगवा, कुमार बेदी आदींनी या वेळी मंत्री म्हणून शपथ घेतली. तसेच श्रुती चौधरी व आरती सिंह या दोन महिलांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. श्रुती या राज्यसभा सदस्य किरण चौधरी यांच्या कन्या तर आरती या केंद्रीय मंत्री राव इंद्रजित सिंह यांची कन्या आहे. राजेश नागर तसेच गौरव गौतम यांनी राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) म्हणून शपथ घेतली. श्रुती चौधरी वगळता इतर सर्वांनी हिंदीत शपथ घेतली. यावेळी केंद्रीय मंत्री अमित शहा, नितीन गडकरी भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा तसेच भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हेदेखील शपथविधीला हजर होते. तसेच मित्र पक्षांपैकी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

हेही वाचा >>>Yahya Sinwar Killed : हमासचा म्होरक्या याह्या सिनवार अखेर ठार, IDF ने दिला दुजोरा; इस्रायल-हमास युद्धाला पूर्णविराम लागणार?

राज्य प्रगतिपथावर नेणार : नायबसिंह सैनी

शपथविधी सोहळ्यापूर्वी सैनी यांनी वाल्मिकी भवन तसेच गुरुद्वारा व पंचकुलातील मानसी देवी मंदिरात पूजा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली नवे सरकार राज्याला प्रगतिपथावर नेईल, असा विश्वास सैनी यांनी व्यक्त केला. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात ९० पैकी ४८ जागा जिंकून भाजपने सलग तिसऱ्यांदा येथे सत्ता मिळवली आहे. दरम्यान, शपथविधी सोडळ्याला स्थगिती देण्याची याचिका सर्वोच्च