दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व नायब राज्यपाल नजीब जंग यांच्यातील वादाचा दुसरा अंक सुरू झाला आहे.  दिल्ली भ्रष्टाचार प्रतिबंध पथकात (एसीबी) बिहारच्या पाच पोलीस अधिकाऱ्यांच्या नियुक्ती करण्याच्या मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या निर्णयास नजीब जंग यांनी थेट केराची टोपली दाखवली आहे.

यापूर्वी जंग यांच्या सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती व बदलीच्या निर्णयाविरोधात केजरीवाल यांनी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र केंद्रीय गृह मंत्रालयाने यासंबंधीचे परिपत्रक काढून जंग यांनाच बदली व नियुक्तीचे अधिकार असल्याचे म्हटले होते. त्याच परिपत्रकाचा दाखला देऊन केजरीवाल यांनी केलेली पाच पोलिसांची नियुक्ती जंग यांनी रद्द केली आहे.

एकशे एक नद्यांत जलमार्ग विकास
नवी दिल्ली : देशात पर्यटनाचे महत्त्व वाढवण्यासाठी अकराशे बेटे व तीनशे दीपगृहे तयार करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रस्ताव आहे. जलमार्गाच्या पायाभूत सुविधांत सुधारणा करून पर्यटन क्षमता वाढवण्याचा विचार असल्याचे रस्ते वाहतूक व महामार्ग खात्याचे मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. विधेयकाला संसदेची मंजुरी घ्यावी लागणार आहे. हे जलमार्ग तयार करण्यासाठी येत्या २-३ वर्षांत पन्नास हजार कोटी रूपये खर्च केले जातील.एक कॅबिनेट टिप्पणी आपल्याकडे पाठवण्यात आली असून त्यानुसार ११०० बेटे व ३०० दीपगृहे बांधण्याचा प्रस्ताव त्यात आहे. त्याचबरोबर जलमार्ग विकसित करण्याचेही नमूद केले आहे असे त्यांनी ‘आंतरदेशीय जलमार्ग’ या विषयावरील परिषदेत सांगितले.

Story img Loader