पीटीआय, चेन्नई

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रियंका गांधी-वद्रा २००८ मध्ये कारागृहात आपल्याला भेटल्या होत्या. त्यांनी आपले पिता राजीव गांधी यांच्या हत्येसंदर्भात तपशील जाणून घेण्यासाठी काही प्रश्न विचारले होते, अशी माहिती माजी पंतप्रधान व ज्येष्ठ काँग्रेस नेते राजीव गांधी यांच्या हत्याप्रकरणी शनिवारी मुक्त केलेल्या दोषी कैद्यांपैकी एक नलिनी श्रीहरन यांनी रविवारी येथे दिली.

एका दशकापूर्वी वेल्लोर मध्यवर्ती कारागृहात भेटल्यावर प्रियंका गांधी भावूक झाल्या होत्या व त्या वेळी रडल्या होत्या, असे नलिनींनी पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. प्रियंका यांनी आपल्या वडिलांच्या हत्येबाबतचा तपशील जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मला या विषयी जेवढे माहिती होते, ती माहिती मी प्रियंका यांना दिली होती. त्या भेटीत घडलेल्या इतर गोष्टींचातपशील सांगता येणार नाही.कारण त्या प्रियंकाच्या वैयक्तिक मतांशी संबंधित आहेत, असेही त्यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर १२ नोव्हेंबरला नलिनी यांची सुटका करण्यात आली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nalini sriharan questioning by priyanka gandhi about rajiv gandhi assassination in a press conference amy