माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्याप्रकरणी वेल्लोर कारागृहात शिक्षा भोगत असणारी नलिनी श्रीहरन हिची एका दिवसाच्या पॅरोलवर सुटका करण्यात आली आहे. नलिनीच्या वडिलांचे निधन झाले असल्याने त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करता यावेत यासाठी तिला एक दिवसाचा पॅरोल देण्यात आला. बुधवारी सकाळी नलिनी वेल्लोर कारागृहातून चेन्नईसाठी रवाना झाली. तिच्यासोबत दहा पोलीस कर्मचारी देखील आहेत. वडिलांवर अंत्यसंस्कार करण्यात आल्यानंतर तिला पुन्हा कारागृहात परत आणले जाणार आहे.
दरम्यान, नलिनी हिच्यासह अन्य सहा आरोपी तमिळनाडूळच्या वेल्लोर मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे. या आरोपींना २८ जानेवारी १९९८ रोजी न्यायालयाने दोषी ठरविले होते. दोषींना सर्वोच्च न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा