भारतीय क्रिकेटपटू आणि माजी खासदार सचिन तेंडुलकरचंही नाव पँडोरा पेपर्सच्या अहवालात आलंय. सचिन तेंडुलकर आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर ब्रिटिश व्हर्जिन आयलँड्समध्ये (BVI) काही कंपन्या होत्या. नंतर २०१६ मध्ये या कंपन्या बंद करण्यात आली. आंतरराष्ट्रीय पातळीवर पत्रकारांचा एक समूह शोधपत्रकारितेच्या माध्यमातून बेनामी संपत्ती आणि काळ्या पैशांच्या व्यवहारांचा पर्दाफाश करत आहे. त्याच मोहिमेत या पँडोरा पेपर्सचा खुलासा झालाय. यात सचिन तेंडुलकरसह भारतातील अनेक बड्या व्यक्तींची नावं आली आहेत.

सचिनची पत्नी अंजली तेंडुलकर आणि सासरे आनंद मेहता यांच्या नावावर बीव्हीआयमध्ये काही कंपन्या होत्या. पनामातील लॉ फर्म एलकोगलच्या अहवालात याचा खुलासा झालाय. एलकोगल पँडोरा पेपर्सचा भाग आहे. बीव्हीआय येथील सास इंटरनॅशनल लिमिटेड नावाच्या कंपनीत तेंडुलकर कुटुंब संचालक मंडळावर आहे. या कंपनीचा सर्वप्रथम उल्लेख २००७ मध्ये झाला होता. जुलै २०१६ मध्ये बंद करण्यात आलेल्या या कंपनीच्या मालकांपासून कुणाला आर्थिक लाभ मिळाला इथपर्यंतची माहिती पँडोरा पेपर्समध्ये आहे.

Marathi actor Sankarshan Karhade meet Sachin Tendulkar
“तू जमिनीवरचा देव दावला…”, सचिन तेंडुलकरच्या भेटीनंतर संकर्षण कऱ्हाडे भारावून गेला; पोस्ट लिहित म्हणाला, “पाच मिनिटं…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
devendra bhuyar marathi news
अजित पवारांच्या पक्षाचा माजी आमदार म्हणतो, “अर्थसंकल्प भ्रमनिराश करणारा!”
pune fake gold marathi news
पुणे : चांदीच्या अंगठ्यांना सोन्याचा मुलामा, सराफाची फसवणूक करणारी टोळी गजाआड
Navri Mile Hitlarla
‘नवरी मिळे हिटलरला’मधील लक्ष्मी व सरस्वतीने शेअर केला व्हिडीओ; सहकलाकारांच्या कमेंट्सने वेधले लक्ष
Cricketer from Dombivli Shreyas Gurav has been selected in mumbai Ranji team
डोंबिवलीच्या श्रेयस गुरव यांची मुंबई रणजी संघात निवड
uddhav thackeray loksatta news
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? संजय राऊत यांनी मांडली भूमिका
Tahawwur Hussain Rana extradited to India
२६/११ हल्ल्यापूर्वी १५ दिवस तहव्वूर राणा मुंबईत; हेडलीच्या दोन ईमेलने कटातील सहभागाचा उलगडा

कंपनी बंद करताना समभागांची (शेअर्स) स्थिती

  • सचिन तेंडुलकर (९ शेअर) : ८५६,७०२ डॉलर
  • अंजली तेंडुलकर (१४ शेअर) : १,३७५,७१४ डॉलर
  • आनंद मेहता (५ शेयर) : ४५३,०८२ डॉलर

अशाप्रकारे सास इंटरनॅशनलच्या शेअर्सची सरासरी किंमत जवळपास ९६,००० डॉलर होती. १० ऑगस्ट २००७ रोजी या कंपनीची स्थापना झाली तेव्हा सास इंटरनॅशनलच्या ९० शेअर्सचं वाटप झालं होतं. यातील ६० शेअर्सचं पहिलं प्रमाणपत्र अंजली तेंडुलकर यांना देण्यात आलं. उर्वरित ३० शेअर्सचं दुसरं प्रमाणपत्र अंजली तेंडुलकरांचे वडील आणि सचिन तेंडुलकर यांचे सासरे आनंद मेहता यांना देण्या आलं. या ९० शेअर्सचं मूल्य ८.६ मिलियन डॉलर म्हणजे जवळपास ६० कोटी रुपये होतं.

सचिनच्या मालकी असलेली कंपनी अचानक २०१६ मध्ये बंद का?

बीव्हीआय येथील सास इंटरनॅशनल लिमिटेड नावाच्या कंपनीचं पनाना पेपर्समध्ये नाव आल्यानंतर ३ महिन्यात ही कंपनी बंद करण्यात आली. एलकोगलच्या स्प्रेडशीटमध्ये सचिन आणि अंजली तेंडुलकरचं नाव पॉलिटकली एक्सपोस्ड पर्सन (राजकीय व्यक्ती) म्हणून नोंदवण्यात आलं होतं. सचिन तेंडुलकर २०१२ ते २०१८4 पर्यंत राज्यसभा सदस्य होता.

सास इंटरनॅशनल लिमिटेडच्या डेटानुसार कंपनी एक डॉलर प्रति शेअर दराने ५०,००० शेअर वाटप करु शकते. सेलर नावाच्या कंपनीला सास इंटरनॅशनलचा सचिव म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं. यानंतर ३१ ऑगस्ट २०१६ रोजी ही कंपनी बंद करण्यात आली. कंपनीच्या डिसॉल्युशनमध्ये भागधारक सचिन तेंडुलकर, अंजली तेंडुलकर आणि आनंद मेहता यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

सचिनच्या वकिलांकडून या प्रकरणी स्पष्टीकरण

पँडोरा पेपर्सच्या खुलाशानंतर सचिन तेंडुलकरच्या वकिलांनी स्पष्टीकरण दिलंय. या कंपनीतील गुंतवणूक कायदेशीर होती आणि याची माहिती कर संस्थांना देण्यात आली होती, अशी माहिती सचिन तेंडुलकरच्या प्रवक्त्याने दिलीय.

सचिन तेंडुलकरने ३१ वर्षापूर्वी केला होता विक्रम; व्हिडिओ शेअर करत जागवल्या आठवणी

Story img Loader