मध्य प्रदेशातली कूनो राष्ट्रीय अभयारण्यात आणखी एका चित्त्याचा मृत्यू झाला. हा चित्ता नामबियातून आणण्यात आला होता. त्याचं नाव शौर्य असं ठेवण्यात आलं होतं. शौर्य हा नामिबीयातून आणलेला दहावा चित्ता होता. कूनो या अभय अरण्यात मृत्यू झालेल्या चित्त्यांची संख्या आता दहा झाली आहे. सिंह प्रकल्पाच्या संचालकांनी एक पत्रक जारी केलं आहे. त्यात हे नमूद करण्यात आलं आहे की १६ जानेवारी या दिवशी दुपारी ३.१७ च्या दरम्यान शौर्य या चित्त्याचा मृत्यू झाला. मृत्यूचं कारण शवविच्छेदनानंतर कळणार आहे असंही सांगण्यात आलं आहे. हा चित्ता जंगलात बेशुद्ध अवस्थेत आढळला होता. त्याच्यावर उपचार सुरु होते.

कूनोमध्ये आणण्यात आले होते २० चित्ते

कूनो नॅशनल पार्कमध्ये प्रोजेक्ट चित्ताच्या अंतर्गत नामीबिया आणि दक्षिण अफ्रिका या ठिकाणाहून २० चित्ते आणण्यात आले होते. या चित्त्यांची चर्चा देशभरात झाली होती. यानंतर आतापर्यंत सात मोठे आणि ३ बछडे अशा दहा चित्त्यांचा मृत्यू झाला.

काही दिवसांपूर्वी मादी चित्त्याने काही दिवसांपूर्वी तीन बछड्यांना जन्म दिला आहे. त्याचे फोटो सोशल मीडियावरही पोस्ट करण्यात आले होते. वन विभागाने याविषयी आनंद व्यक्त केला होता. केंद्रीय पर्यावरण मंत्री भुपेंद्र यादव यांनीही या बछड्यांचे फोटो पोस्ट केले होते. हे तिन्ही बछडे सध्या व्यवस्थित आहेत. त्यांची प्रकृती उत्तम आहे असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

हे पण वाचा- कुनो राष्ट्रीय उद्यानात दुसऱ्यांदा पाळणा हलला; चित्ता ‘आशा’ ने दिला तीन बछड्यांना जन्म

आत्तापर्यंत १० चित्त्यांचा मृत्यू

‘साशा’ या मादी चित्त्याचा २७ मार्चला मूत्रपिंडाच्या आजाराने, तर ‘उदय’ या चित्त्याचा १३ एप्रिलला हृदय निकामी झाल्यामुळे आणि ‘दक्षा’ या मादीचा ९ मे रोजी चित्त्यांच्या झुजीनंतर मृत्यू झाला. त्यानंतर ११ जुलैला ‘तेजस’, १४ जुलैला ‘सूरज’ तर दोन ऑगस्टला ‘धात्री’ या मादी चित्त्याचा मृत्यू झाला. भारतात चित्ते आल्यानंतर त्यातील एका मादी चित्त्याने २४ मार्चला चार बछड्यांना जन्म दिला. मात्र, २३ मे रोजी एक तर २५ मे रोजी दोन बछड्यांचा मृत्यू झाला. तसंच आज ‘शौर्य’ या चित्त्याचा मृत्यू झाला.

Story img Loader