बलात्कारविरोधी कायद्यात सुधारणा करून त्या कायद्याला ‘त्या’ तरुणीचेच नाव द्यावे अशी कल्पना केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री शशी थरूर यांनी काल (मंगळवार) ट्विटरवरून सुचवली होती. तोच धागा पकडून तरूणीचं नाव जाहीर करण्यास हरकत नसल्याचं, तीच्या कुटुंबीयांनी सांगितल्याचं पीटीआयने म्हटलं आहे. चांगल्या कामासाठी नाव वापरण्यात येणार असेल, तर आपली हरकत नसल्याचं कुटुंबियांनी म्हटलं आहे.
‘त्या’ तरुणीची ओळख लपवून काय हशील? उलट या घटनेनंतर बलात्काऱ्यांना शिक्षा देण्यासाठी असलेल्या कायद्याची पुनर्रचना करण्याची मागणी होत आहे. ही मागणी योग्यच असून सुधारित कायद्याला या मुलीचेच नाव द्यावे अशी कल्पना थरूर यांनी सुचवली होती. तिच्या पालकांची हरकत नसेल तर असे करण्यास कोणाची काही हरकत नसावी, असेही थरूर यांनी ‘ट्विट’ केले होते. त्यावर ट्विटवर उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत.
शशी थरुर यांचं हे वैयक्तिक मत असल्याचं सांगत काँग्रेसने हात झटकले आहेत. तर, महिला आयोगानेही आक्षेप घेतला आहे. भाजपने थरुर यांच्या विधानावर टीका केली असली तरी माजी आयपीएस किरण बेदी मात्र थरुर यांच्या मताशी सहमत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा