काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली आहे. “नितीन गडकरींनी भाजपामध्ये घुसमट होत असल्यास काँग्रेसमध्ये यावं, त्यांची आम्ही साथ देऊ” असे अकोल्यामध्ये माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून नितीन गडकरी पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. त्यानंतर काँग्रेसने दिलेल्या या ऑफरला नितीन गडकरी काय प्रतिसाद देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“राहुल गांधींच्या टी शर्टची किंमत…”, काँग्रेसचा भाजपाला टोला; नरेंद्र मोदींचं नाव घेत दिला खोचक सल्ला!

काही दिवसांपूर्वी केंद्रीय निवडणूक समिती आणि भाजपाच्या संसदीय मंडळातून नितीन गडकरी यांना वगळण्यात आले होते. त्यानंतर भाजपामध्ये गडकरींचे पंख छाटण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे बोलले जात आहे. काँग्रेस हा लोकशाही व्यवस्था मानणारा पक्ष आहे. त्यामुळेच काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत निवडणूक घेतली जाते, असे पटोले म्हणाले आहेत. देशात भाजपाविरोधात बोलणाऱ्यांच्या मागे ईडी, सीबीआय लावली जाते असा आरोपही त्यांनी केला आहे.

Rahul Gandhi’s T-shirt row :भाजपा अजून खाकी चड्डीतून बाहेर येत नाहीये – छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांचा निशाणा

दरम्यान, राहुल गांधी यांच्या टी शर्टच्या किमतीवरुन पटोले यांनी भाजपाला लक्ष्य केले आहे. “काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेमुळे भाजपाला धडकी भरली आहे. त्यामुळेच टी शर्टच्या किमतीसारखे टुकार मुद्दे भाजपाला काढावे लागत आहे”, असा पलटवार पटोले यांनी केला आहे. नरेंद्र मोदी १० लाखांचा सूट, १.५ लाखांचा चष्मा, ८० हजारांची शाल, ८ हजार कोटी रुपयांचे विमान वापरतात आणि फकीर असल्याचा कांगावा करतात, असा हल्लाबोलही पटोले यांनी नरेंद्र मोदींवर केला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nana patole gave offer to bjp leader nitin gadkari to join congress rvs
Show comments