सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना लक्ष्य केलं. ‘नाना पटोलेंनी त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना न विचारता विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर राजीनाम्याची माहिती दिली,’ असा आरोप अजित पवारांनी केला आहे. त्याला नाना पटोलेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अजित पवार काय म्हणाले?

“प्रतोद नेमण्यापासून अनेक गोष्टींना सर्वोच्च न्यायालयाने चुकीचं म्हटलं. मात्र, पुढे काय झालं? यामध्ये एक तर आमचे त्यावेळचे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा दिला. तो राजीनामा त्यावेळचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना न विचारता देण्यात आला. राजीनामा दिल्यावर माहिती देण्यात आली. एक तर तो राजीनामा द्यायला नको होता. राजीनामा दिल्यानंतर लगेच पुन्हा विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेऊन तो विषय संपवायला हवा होता. तेही दुर्दैवाने आमच्या सगळ्यांकडून झालं नाही.”

हेही वाचा : ठाकरे गटाने बजावलेल्या व्हीपनुसार १६ आमदार अपात्र होणार का? उज्ज्वल निकम यांचं मोठं विधान; म्हणाले…

“विधानसभा अध्यक्ष मविआ नेते असते तर १६ आमदार अपात्र झाले असते”

“मी यासाठी एकट्याला दोषी धरत नाही. आमच्या महाविकास आघाडीकडून तो विषय तातडीने धसास लागला असता, तर तिथं विधानसभा अध्यक्ष बसले असते आणि त्यांच्या अधिपत्याखाली या सर्व गोष्टी झाल्या असत्या. मोठा काळ विधानसभेचे उपाध्यक्ष काम पाहत होते. अध्यक्षांची जागा रिक्त राहिली होती,” असं मत अजित पवारांनी व्यक्त केलं.

“मला आदेश आलाय, राजीनामा द्यावा लागेन”

यावर दिल्लीत ‘एपीबी माझा’शी बोलताना नाना पटोलेंनी अजित पवारांना खोटारडे म्हटलं आहे. “अजित पवार खोट बोलत आहेत. अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात आम्ही एकत्र अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांना भेटलो. त्यांना सांगितलं होतं, मला आदेश आलाय, राजीनामा द्यावा लागेन,” असं नाना पटोले म्हणाले.

हेही वाचा : “…तर नरेंद्र मोदी अडचणीत येतील”, ‘त्या’ प्रकरणाचा उल्लेख करत संजय राऊतांचा इशारा

“एक वर्ष आम्ही अध्यक्षांची नेमणूक केली नाही, हे…”

“मी अध्यक्षपदावरून नव्हतो, तर उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना आमदारांवर अपात्रतेची कारवाई करता आली असती. ती त्यांनी केली नाही. एक वर्ष आम्ही अध्यक्षांची नेमणूक केली नाही, हे अजित पवारांनी मान्य केलं. पण, उपाध्यक्षांनी अध्यक्षांचे अधिकार वापरले नाहीत,” असेही नाना पटोलेंनी सांगितलं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nana patole reply ajit pawar allegation do not talk uddhav thackeray will resign assembly chairman ssa
Show comments