युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या अनेक भारतीय विद्यार्थ्यांना आतापर्यंत मायदेशी परत आणण्यात आलंय. तर, अनेक विद्यार्थ्यांना युक्रेनच्या सीमेलगत असणाऱ्या देशांमध्ये नेण्यात आलंय. तिथून त्यांना मायदेशी आणलं जाईल. दरम्यान, गेल्या आठवड्यात ६,२२२ विद्यार्थ्यांना भारतात सुखरुप आणल्याची माहिती केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दिली आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी केंद्र सरकारकडून ऑपरेशन गंगा मोहीम राबवली जात आहे. परंतु या मोहिमेवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एक व्हिडीओ शेअर करत टीका केली आहे.

Russia Ukraine War: रशियाकडून युक्रेनमधील दोन शहरांत युद्धविरामाची घोषणा; नेमकं कारण काय?

Yogi Adityanath who made the statement Batenge to Katenge now has a different slogan Pune news
‘बटेंगे तो कटेंगे’ असे वक्तव्य करणारे याेगी आदित्यनाथ यांचा आता ‘हा’ नारा
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
nitish kumar bows down to touch feet of pm modi
VIDEO: भरसभेत नितीश कुमार पाया पडायला गेले अन् नरेंद्र मोदींनी…; नेमकं काय घडलं?
indians want to move abroad indians want opportunity to leave India
भारतीयांना भारत सोडण्याची संधी का हवी असते?
maharashtra vidhan sabha election 2024 tought contest in five assembly constituencies in akola district
अकोला जिल्ह्यात तुल्यबळ लढतींची रंगत; जातीय राजकारण व मतविभाजन निर्णायक ठरणार
41 lost mobile returned to complainant by pune police on the occasion of diwali
हरवलेले ४१ मोबाइल संच तक्रारदारांना परत; दिवाळीनिमित्त पोलिसांकडून अनोखी भेट
Jammu and Kashmir Chief Minister Omar Abdullah statement on Atal Bihari Vajpayee
वाजपेयींच्या मार्गानेच जायला हवे होते!
Loksatta chawdi Jarange Patil candidate Election politics news
चावडी: नुसतंच जागरण हो… !

“ऑपरेशन गंगा हे निव्वळ मोदी सरकारचे ढोंग आहे, प्रत्यक्षात विदयार्थी स्वतःचा जीव धोक्यात घालून ६०० किलोमीटर चालत सीमेवर जात आहे.” अशा कॅप्शनने नाना पटोले यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे.

काय आहे व्हिडीओत?

“आम्ही सुमी स्टेट युनिव्हर्सीटीचे विद्यार्थी आहोत. आज युद्धाचा १० वा दिवस आहे. रशियाने युद्धबंदी करत नागरिकांना युक्रेनमधून बाहेर पडता यावं, यासाठी मानवतावादी मार्ग  उघडला आहे. त्यापैकी एक मारियुपोलमध्ये आहे. मारियुपोल सुमीपासून ६०० किलोमीटर दूर आहे. सकाळपासून इथे हल्ले सुरू आहेत. आम्ही सगळे घाबरले आहोत. आम्ही भारतीय दूतावासाकडून मदतीची खूप वाट पाहिली, परंतु आता आम्ही वाट पाहू शकत नाही. आम्ही आमचा जीव धोक्यात घालून युक्रेनच्या सीमेकडे निघालो आहोत. आमच्या जीवाचं काही बरं वाईट झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी ही भारत सरकार आणि भारतीय दूतावासाची असेल. आम्हाला काही झाल्यास हे ऑपरेशन गंगाचं अपयश असेल. सुमी स्टेट युनिव्हर्सीटीच्या विद्यार्थ्यांचा हा शेवटचा व्हिडीओ आहे, तुम्हाला माहित असावं, की आम्ही सीमेच्या दिशेनं निघालोय, म्हणून हा व्हिडीओ आम्ही शेअर करत आहोत,” असं या विद्यार्थ्यांनी म्हटलंय.